शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सातारकर ‘गो ग्रीन’ झाले अन् वीज बिलात १४ लाख वाचवले!

By सचिन काकडे | Published: December 20, 2023 3:55 PM

छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत

सातारा : महावितरणच्या वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर बंद करीत जिल्ह्यातील ११ हजार ५२५ ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. या ग्राहकांची वार्षिक १३ लाख ८५ हजार रुपयांची बचत झाली असून, या योजनेत ग्राहकांचा सहभागही वाढू लागला आहे.महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येते. सोबतच ‘एसएमएस’द्वारेदेखील वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे तातडीने बिल भरणा करणे सोपे झाले आहे.आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ‘गो ग्रीन’ योजना पर्यावरण रक्षणासाठीदेखील महत्त्वाची आहे. या योजनेत पुणे प्रादेशिक विभागांतर्गत सातारा जिल्ह्यातील ११ हजार ५२५ ग्राहकांनी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडला आहे. हे ग्राहक ऑनलाइन वीज बिल भरत असल्याने प्रत्येक ग्राहकाची मासिक १० तर वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. या ग्राहकांची एका वर्षात तब्बल १३ लाख ८३ हजार रुपयांची बचत झाली आहे.

  • वीजग्राहकांनी ‘गो ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाइल ॲप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  • ‘गो ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येते.
  • संकेतस्थळावर चालू वीज बिलासह मागील ११ महिन्यांचे वीज बिल मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही उपलब्ध होऊ शकते.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण