येथील रयत शिक्षण संस्थेच्या महिला महाविद्यालयातील मराठी विभागाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय कांबळे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ कवी व साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्राचार्य संजय कांबळे म्हणाले, मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा असून मराठीतील विविध प्रकारच्या साहित्य प्रकाराचा विद्यार्थिनींनी अभ्यास केला पाहिजे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. दैनंदिन व्यवहारातील वापराने मराठी भाषेचे संवर्धन होईल.
यावेळी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. आबासाहेब उमाप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कल्पना पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. सुरेश साळुंखे यांनी आभार मानले.