बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंगापूर भागात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता गस्त घालत असताना बोरगाव पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांना वर्णे हद्दीतील रस्त्यावर एक गाडी जाताना दिसली. त्यावेळी गाडीच्या चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी तत्काळ गाडी थांबवून गाडीतील कागदपत्रे तसेच मालाबद्दल चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली? त्यामुळे गाडीची तपासणी केली असता गाडीत ९० मिली देशी दारूच्या एक हजार बाटल्या सापडल्या. देशी दारू वाहतुकीचा कोणताही परवाना चालकाकडून मिळाला नसल्याने बेकायदा दारूसाठा जप्त करण्यात आला. तसेच दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार विशाल जाधव यांनी केली.
दारू वाहतूक करणाऱ्या गाडीचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:27 AM