जिल्ह्यात शनिवार व रविवारी कोणतीही आस्थापना सुरू राहणार नाहीत, सुरू ठेवल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही याबाबत आदेश दिले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर आरोग्य विभागाचे निरीक्षक मिलिंद शिंदे, वरिष्ठ मुकादम मारुती काटरे व कर्मचारी अभिजित खवळे, अशोक डाईंगडे, सोनू चव्हाण सध्या कारवाई करीत आहेत. शहरात अनेक दुकाने शटर खाली करून सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक दुकानांवर कारवाई करण्यात काम सुरू आहे. यामध्ये मोबाइलचे दुकानांची मोठी संख्या आहे. अनेक जनरल स्टोअर्सही शटर खाली करून आतमध्ये सुरू आहेत.
कार्वे नाका परिसरातील रोडवरील विक्रेते दुकानदार, हॉटेल तसेच सुपर मार्केटमधील अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बझार, मोबाइल शॉपी, चिकन सेंटर, मसाला दुकान, हार्डवेअर दुकान, प्लायवूड दुकानांवर पालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १६ हजार ५०० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
फोटो : १३केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाड पालिकेच्या पथकाने सुपर मार्केटमधील दुकानांवर कारवाई करून दंड वसूल केला.