सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंन करत विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. शनिवारप्रमाणेच रविवारीही सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई आली. यावेळी पोलिसांनी काहींच्या दुचाकीही जप्त केल्या.
राजवाडा परिसरात काहीजण विनाकारण दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि विनाकारण फिरणाऱ्यांना रोखत त्यांच्याविरोधात कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये रवी देशपांडे, स्वाती भोसले, स्नेहा भोसले (सर्व. रा. चिमणपुरा पेठ, सातारा) व अक्षय भोसले (रा. सैदापूर) यांचा समावेश आहे. या चौघांवर विनाकारण फिरुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्या दुचाकीही जप्त केल्या आहेत. दरम्यान, दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी राम जनार्दन साळुंखे (वय ४८, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. पोलीस नाईक धनंजय कुंभार, पोलीस नाईक साबळे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमळे यांनी ही कारवाई केली.
सातारा शहर पोलिसांनीही पोवइ नाका परिसरातील फास्ट फूडचे दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी गणेश शंकरराव तोरस्कर (वय ३९, रा. करंजे, महानुभव मठाशेजारी, सातारा) यांच्यावर कारवाई केली.