शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रोजगाराच्या प्रश्नावर कृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 10:52 PM

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. हेच मुद्दे निवडणुकीनंतरही तितक्याच तडफेने मांडून जिल्ह्यातील बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा जिल्ह्यातील स्थानिक जनतेची आहे.साताऱ्यातील विविध शासकीय, खासगी आयटीआय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांतून कुशल मनुष्यबळ तयार होते. मात्र, त्यांना अपेक्षित पगाराची नोकरी मिळविण्यासाठी पुणे अथवा मुंबई गाठावी लागते. अनेकजण बेंगलोरलाही जातात, काहीजण परदेशात जाऊन नोकरी करत तिथंच स्थायिक होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.सातारा शहरासह इतर शहरे व गावांमध्ये सहज जरी फेरफटका मारला तरी तरुण कमी आणि वयस्कर लोकच जास्त पाहायला मिळतात. स्थानिक तरुण नोकरीनिमित्त सातारा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात गेलेला असतो. गावात अपेक्षित रोजगार मिळत नसल्याने सातारा, वाई, फलटण, शिरवळ, लोणंद, कºहाड येथील औद्योगिक वसाहतीत अल्प मोबदल्यात काम करणारे अनेक तरुण आपण पाहतो. मात्र, त्यापुढे जाऊन भविष्याचा विचार करून पुणे-मुंबईत राहून नोकरी करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने गावे ओस पडलेली पाहायला मिळतात.शेतीमधील उत्पादनांना हमी भाव मिळाला तर स्थानिक शहरात नोकरी करून गावातील शेतीकडेही तरुणांना लक्ष देता येईल, मात्र तसे होत नाही. लोकप्रतिनिधींनी या समस्या ओळखून योजनांची अंमलबजावणी करावी, अशी तरुणांची अपेक्षा आहे. त्याबरोबरच उद्योजकांना सुरक्षित वातावरण मिळाले तर उद्योग वाढून रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा उद्योजकांची आहे.बेरोजगार तरुणांना काय हवे?1मुले-मुली तांत्रिक शिक्षण घेतात, मात्र त्यांना रोजगार देण्याच्या बाबतीत सातारा शहरात मर्यादा येताना दिसतात. त्यामुळे पुणे-मुंबईतल्या नोकºया साताºयात मिळाल्या पाहिजेत.2सातारा शहराच्या १६ ते २० किलोमीटर परिघात मोठे उद्योग येणे गरजेचे आहे. साताºयातील विशाल औद्योगिक वसाहतीचा विकास झाला पाहिजे.3 आयटीआय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॅम्पस इंटरव्ह्यूतून उत्तम पगाराची कायमस्वरुपी नोकरी मिळावी.रोजगाराचा लेखाजोखारोजगार कार्यालयातील नोंदीनुसार पाच वर्षांत ७४ हजार ४९८ बेरोजगारांची नोंद आहे. त्यामध्ये ३१ हजार ८८८ लोकांना पाच वर्षांच्या काळात रोजगार उपलब्ध झाला.उद्योजकांच्या या आहेत अपेक्षा1उद्योजकांना सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे. खंडणीखोर लोकांवर पोलीस यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींनीही वचक ठेवावा.2औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरुस्ती वेळच्यावेळी होणे गरजेचे आहे. आर्थिक मंदीच्या काळात कामगार आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनीही कंपनीला सहकार्य करणे गरजेचे आहे.3 तांत्रिक ज्ञान असणाºया तरुण-तरुणींना नोकरी देण्यात अडचणी येत नाहीत, कारण कामाच्या पहिल्या दिवसापासूनच हे लोक संबंधित संस्थेला फायद्याचे ठरतात.