फलटण : ‘फलटण शहरात कोणी मांजाविक्रेत्याने मांजाविक्री केल्यास विक्रेत्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ असा इशारा फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पतंग मांजा विक्रेते यांची बैठक पोलीस ठाण्यात घेण्यात आली. या बैठकीत नायलॉन मांजाच्या वापरामुळे यापूर्वी झालेल्या अप्रिय घटनेची माहिती देऊन कोणीही नायलॉन मांजा विक्री करणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी मांजा विक्रेते यांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटिसा देण्यात आल्या असून, दिलेल्या नोटिशीचे उल्लंघन केल्यास प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अशाप्रकारे कोणी नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याचे आपले निदर्शनास आल्यास फलटण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केले आहे.
फोटो
२५फलटण-मांजा
फलटण येथे राजरोसपणे मांजाविक्री होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांची शहरातील विक्रेत्यांची बैठक घेऊन विक्री थांबविण्यास सांगितले. (छाया : नसिर शिकलगार)