वाठार स्टेशन : ‘गणेशोत्सव काळात धर्मदाय आयुक्त, महावितरण व पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी पालन करावे. समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत. उत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यास संबंधित गणेश मंडळांवर कारवाई केली जाईल,’ असा इशारा कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी दिला.
वाठार स्टेशन येथे ‘गणराया अवार्ड २०१६’ मधील ‘एक गाव एक गणपती’ तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी धमार्दाय आयुक्त कायार्याचे निरीक्षक दिनेश महामुनी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षक मंगल जाधव, महावितरणचे अभियंता मंचरे, वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर आदी उपस्थित होते.
प्रेरणा कट्टे म्हणाल्या, ‘लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भूमिका मांडली आज याचा विसर गणेश मंडळांना पडला आहे. सामाजिक सलोखा घडवण्यासाठी मंडळाचे काम हे समाजभिमुख असावे. जास्तीतजास्त गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे. त्यांना पोलिसांचे सहकार्य राहील. महिलांचा समावेश मंडळाच्या कार्यकारिणीत असावा अशी सूचना त्यांनी केली.
‘एक गाव एक गणपती’ बसवणाºया २५ गावामधून युगांतर प्रतिष्ठान विखळे यांना तिसरा, हनुमान गणेशोत्सव मंडळ जगतापनगर यांना दुसरा तर गणेश मित्र मंडळ होलवाडी यांना प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून जय तुळजा भवानी गणेशोत्सव मंडळ देऊर यांना प्रथम, जय शिवराय गणेशोत्सव मंडळ अंबवडे द्वितीय व पिंंपोडे बुद्रुकच्या श्रीराम गणेशोत्सव मंडळाने तिसरा क्रमांक पटकविला.
मयूर वैरागकर यांनी प्रास्ताविक केले. तर सहायक पोलिस निरीक्षक चिंचकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास दिलीप धुमाळ, गुलाबसिंग कदम यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.