सातारा : शहर आणि परिसरात कोरोना वाढत असताना मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि दुकानेही उघडी ठेवू नयेत, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशांवर सातारा पोलिसांकडून कारवाईचा दंडुका उगारला जात आहे. शिवराज तिकाटणे ते खिंडवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या १८ जणांवर आणि यवतेश्वर, अंबवडे, तसेच सातारा परिसरात दुकान उघडे ठेवणारे तीन दुकानदार, अशा २१ जणांवर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मॉर्निंग वॉक करणाऱ्यामंध्ये सूरज शरद पोळ (रा. गोळीबार मैदान, सातारा), शुभम मोहन घोरपडे (रा. शाहूनगर, गोडोली), अनिल डांगे (रा. शाहूनगर), प्रथमेश सुनील भोसले (रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली), ऋषिकेश अंकुश गायकवाड (रा. विलासपूर, सातारा), ओमकार जांभळे, शुभम सुनील लोंढे (रा. शाहूनगर), अमित सुधाकर आपटे (रा. रामाचा गोट, सातारा), अमितराव शंकरराव जाधव (रा. साईबाबा मंदिर, गोडोली), दिलीप दादासाहेब जोशी, (रा. साईबाबा मंदिर, गोडोली), सूरज शरद पोळ (रा. गोळीबार मैदान, सातारा), योगेश सुरेश तारळकर (रा. रामाचा गोट, सातारा), अथर्व रमेश बर्गे (रा. प्रताप कॉलनी, एमआयडीसी, सातारा), विशाल लालासाहेब जगदाळे (रा. कर्मवीरनगर, सातारा), अजिंक्य रामचंद्र बाबर (रा. विसावा नाका, गोरखपूर, सातारा), अनिल डांगे (रा. शाहूनगर) यांचा समावेश असून, या सर्वांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार संतोष कचरे, विशाल धुमाळ, कृष्णदेव शेडगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान, राहुल बाळासाहेब पवार (रा. यवतेश्वर, ता. सातारा) यांनी नीलम मसाला ड्रायफ्रूटस् दुकान, तर संतोष किसन जाधव (रा. अंबवडे, ता. सातारा) व सुशील रामचंद्र गायकवाड (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांनी रंगाचे दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विश्वनाथ मेचकर यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.