सातारा : जिल्ह्यातील निर्बंध काहीसे शिथिल करताच विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
इंद्रजीत अंकुश कणसे (वय ३०, रा. खिंडवाडी, योगेश गणेश पवार (वय २७, रा. खिंडवाडी हे दोघे २३ रोजी यवतेश्वर रस्त्यावर आपल्या वाहनातून (एमएच - बीएम ९६) विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. दरम्यान, संभाजी यशवंत जाधव (रा. वर्धनगड, ता. खटाव हल्ली रा. गडकर आळी, सातारा) हा यवतेश्वर रोडवर विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले.
त्याचप्रमाणे ललित बाळासाहेब रसाळ (वय २८, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा)) हा कार (एएच. ए. जे. ४०००) मधून विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. तर आकाश अतुल शालगर (रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी), रोहन जालिंदर पवार (रा. शिवसुंदर कॉलनी, विकासनगर सातारा (वाहन क्र. एमएच- बीव्ही ५२८१), पार्थ बोधे (वय २१, रा. सोमवार पेठ, सातारा, शैलेश पुरुषोत्तम करंदीकर (वय ४९ रा. शाहूपुरी सातारा), धनंजय परशुराम अवसरे (वय ४८, रा. गुरुवार पेठ, सातारा) (गाडी क्र. एमएच ११ एके ७१०६), रोहन जालिंदर पवार (रा. शिवसुंदर कॉलनी, विकासनगर सातारा (गाडी क्र. एमएच- बी. व्ही. ५२८१) हे सर्वजण यवतेश्वर रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आले.
वरील सर्वांना जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीआरपीसीनुसार नोटीस बजावण्यात आली आहे.