मलकापूर : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ साठी मलकापूर शहर सध्या विविध उपक्रम राबवित आहे. नागरिकांसह महिलांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा म्हणून नगरपंचायतीने विविध उपक्रम व कार्यक्रमांचे गल्लोगल्ली आयोजन केले जातेय. नगरपंचायतीच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमात ‘तिळगूळ घ्या, गोड बोला ऐवजी तिळगूळ घ्या, स्वच्छता राखा,’ असा स्वच्छतेचा जागर केला जात आहे. नगराध्यक्षा सुनीता पोळ, मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासह महिला नगरसेविकांकडून जणू पायाला भिंगरीच लावल्याप्रमाणे घराघरात स्वच्छतेचा जागर केला जात आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ अंतर्गत देशातील ४ हजार ५१ शहरांमध्ये होणाºया स्पर्धेत मलकापूरने भाग घेतला आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यांत शहराचे ४ हजार गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सेवास्तर प्रगतीत १ हजार ४०० गुण देण्यात येणार आहेत. शासनाच्या या योजनेत नगरपंचायत स्थरावरील मलकापूर शहर हेएकमेव शहर आहे.
मलकापूर शहराने स्वच्छतेबाबत सातत्याने विविध पर्याय अवलंबिले आहेत. शहराला देशात पहिल्या २५ शहरांमध्ये आणण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिकाºयांनी ताकतीने तयारी सुरू आहे.मलकापुरात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ओल्या कचºयापासून खतनिर्मितीचा प्रकल्प ८ जुलै २०१७ पासून कार्यान्वित केला आहे. ओल्या कचºयापासून मेकॉनिकल रोटरी बेस कंपोस्ट खत निर्मिती केली जात आहे.
या खतास शासकीय लॅबमधून तपासणी करून ‘मलकापूर हरित महासिटी कंपोस्ट’ खत असे नामकरण केले आहे. तेखत केवळ नाममात्र ५ रुपये किलोप्रमाणे शेतकºयांना विक्री केले जात आहे. स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी शहरातील दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,चौदा खासगी विद्यालये, महाविद्यालये, त्याचबरोबर बावीसअंगणवाड्या यांचा सामावेश केला आहे.
शिक्षक, विद्यार्थी, पालकांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवले जात आहे. या अभियानात शहरातील सर्व नागरिकांनी स्वत:साठीच स्वच्छता करायची आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावाम्हणून शहरातील घराघरातील महिलाच स्वच्छतेबाबत जागृत झालीपाहिजे, असा विचार करण्यात आला आहे.या विचारानेच नगरपंचायत प्रशासनाने शहरातील गल्लोगल्ली हळदी कुंकू व तिळगूळ वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमातूनच ‘तिळगूळ घ्या स्वच्छता राखा’ हा संदेश तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याचाजागर युद्धपातळीवर सुरू आहे.
मलकापूर शहर हे केवळ स्पर्धेपुरते स्वच्छ नव्हे तर कायमचेच स्वच्छ राहावे. यासाठी शहरातील लोकांनीही आपली मानसिकता बदलून सहकार्य करावे, असे आवाहन हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना लोकप्रतिनिधी व नगरपंचायतीतील अधिकाºयांकडून केले जात आहे.कचºयासाठी वीस हजार बकेटचे वाटप‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ च्या अनुषंगाने नगरपंचायतीने विशेष नियोजन केले असून, शहरातील ‘ओला व सुका’ कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी ९ घंटागाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये पाच नवीन घंटागाड्यांचा समावेश करण्यात आला आहेत. नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे घंटगाडीत टाकावा, त्यासाठी शहरातील दहा हजार घरांत प्रत्येकी दोन बकेट प्रमाणे वीस हजार बकेटचे वाटप केले आहे.
नागरिकांची स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार आल्यास तिच्या तत्काळ निवारणाची सोय केली आहे. आपले शहर हे देशाच्या स्पर्धेत आहे. हे प्रत्येक नागारिकाने लक्षात ठेवले पाहिजे. ही स्पर्धेपुरती स्वच्छता नसून माझे घर, माझा परिसर व माझे शहर कायम स्वच्छ राहिले पाहिजे, अशी मनात खूणगाठ बांधून प्रत्येकाने स्वच्छतेसाठी मी तयार आहे, हा निश्चय केला पाहिजे.- मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष, मलकापूरझोपडपट्टीच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन कोटींतून संरक्षक भिंत बांधली तसेच पाणी, रस्ते, गटर, स्वच्छतागृह, दिवाबत्तीसारख्या प्राथमिक सुविधा दिल्या. सुधारित झोपडपट्टीचा मास्टर प्लॅनही तयार केला आहे. यापूर्वी नगरपंचायतीच्या उपक्रमात भाग घेऊन झोपडपट्टीतील प्रत्येक नागरिकाने नगरपंचातीच्या प्रगतीत हातभार लावला आहे. त्याप्रमाणेच स्वच्छ सर्वेक्षणमध्येही भाग घेऊन संपूर्ण झोपडपट्टी कायमस्वरुपी स्वच्छ ठेवू या.- सुनीता पोळ , नगराध्यक्षा, मलकापूरकचरा कमी करण्यावर भर देऊन कमीत कमी कचरा नगरपंचायतीकडे द्यावा. कचºयाचे प्रमाण कमी झाल्यास तो उचलण्याचा व कचºयाची वाहतूक करण्याचा खर्च कमी होऊन त्या रकमेचा विनियोग दुसºया विकासकामांसाठी होईल. स्वच्छता अभियान ही स्पर्धा नव्हे तर एक चळवळ म्हणून त्याकडे आम्ही पाहत आहोत.- संजीवनी दळवी, मुख्याधिकारी, मलकापूर