शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

आदर्कीच्या पर्जनमापकाला वारूळाचा वेढा, देखभालीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 11:01 AM

Rain Satara : फलटण तालुक्यातील आदर्की महसुली मंडलातील शेतकऱ्यांना हवामानातील बदल, पाऊस, वादळ, पर्जनमान समजण्यासाठी स्वयंचलीत पर्जन मापक महसूल व कृषी विभागाने बसवले आहे. पण त्याची देखभाल होत नसल्याने आदर्कीच्या पर्जनमापकास वारूळाचा वेढा पडल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देआदर्कीच्या पर्जनमापकाला वारूळाचा वेढा, देखभालीकडे दुर्लक्षशेतकऱ्यांना वातावरणातील बदलाची माहिती मिळणे बनले अवघड

सूर्यकांत निंबाळकरआदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की महसुली मंडलातील शेतकऱ्यांना हवामानातील बदल, पाऊस, वादळ, पर्जनमान समजण्यासाठी स्वयंचलीत पर्जन मापक महसूल व कृषी विभागाने बसवले आहे. पण त्याची देखभाल होत नसल्याने आदर्कीच्या पर्जनमापकास वारूळाचा वेढा पडल्याचे चित्र दिसत आहे.फलटण तालुक्यातील आदर्की महसूल मंडलातील बिबी, घाडगेवाडी, सासवड, हिंगणगाव, शेरेचीवाडी, कापशी, आळजापूर, आदर्की खुर्द, टाकोबाईचीवाडी, वडगाव, कोऱ्हाळे, वाघोशी गावात पाऊस किती पडला याची नोंद महसुली दप्तरी होण्यासाठी आदर्की बुद्रूक येथील जुनी ग्रामपंचायत इमारतीच्या छतावर व भैरवनाथ मंदिरावर ठेवले आहे. त्यांच्यावर अचुक पर्जनमान मोजले जात नव्हते त्याला पर्याय म्हणून आदर्की बुद्रुक येथील मठाजवळ स्वयंचलीत पर्जनमापक बसवले आहे.

यामुळे महसूल व कृषी खात्याबरोबर शासनाला पाऊस, वादळ, हवामानातील बदल याचा अचूक अंदाज येऊ लागल्याने शेतकरी पिक पद्धतीत बदल करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. यामुळे आदर्की महसुली मंडलातील शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे. पण महसूल व कृषी विभागाने स्वयंचलीत पर्जनपाक यंत्राकडे दुर्लक्ष केले. त्यातच गेल्या महिन्यात गाजर गवत वाढले.

यामुळे पर्जमापक दिसत नव्हते. त्यावर ग्रामसभेत चर्चाही झाली होती. तेव्हा कृषी सहायक अडसुळ यांनी आमचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करून जातात पण त्याची देखभाल, स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र निधी व मनुष्यबळ नाही. आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत, असे सांगितले होते.त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तननाशिक फवारुन गांजर गवत जळुन गेले पण पर्जमापक यंत्राला दोन फुट उंच मातीच्या वारुळाला वेढा घातला आहे. तो मात्र जैसे थे असल्याचे चित्र दिसत आहे.पर्जन मापकामुळे शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई, अवकाळी, वादळी पाऊस, अतिवृष्टी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. शासनाने हजारो रुपये खर्चुनही पर्जनमापकाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप शिवसेनेच्या ग्राहक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंत बासर यांनी केला आहे. 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर