शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

उमरकांचनच्या पुनर्वसनासाठी तडसर गावचा आराखड्यात समावेश करा

By admin | Published: April 24, 2017 10:02 PM

विजय शिवतारे; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सूचना

सातारा : ‘वांग-मराठवाडी धरणग्रस्त मौजे उमरकांचन गावच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्यातील तडसर गाव आराखड्यात समावेश करावे,’ अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या.कृष्णा खोरे महामंडळाच्या प्रलंबित पुनर्वसन प्रश्नांबाबत पालकमंत्री शिवतारे यांनी सोमवारी येथील नियोजन भवनात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार शंभूराज देसाई, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, सांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी संजय चव्हाण, पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, तुषार ठोंबरे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे स प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.सुरुवातीला आमदार देसाई यांनी सर्वांचे स्वागत करून प्रलंबित प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सविस्तरपणे सांगितले. यावर पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘वांग-मराठवाडी धरणासाठी मौजे उमरकांचनमधील ६२ जणांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्यातील तडसर गावात जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शासनाच्या नव्या धोरणानुसार अशा जागा पुनर्वसनासाठी प्राधान्याने शेतकऱ्यांना देण्यात याव्यात. त्यासाठी पुनर्वसन आराखड्यात तडसर गावचा समावेश करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.या गावाचा समावेश झाल्यास सांगली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून हा प्रस्ताव शासनाला जाईल आणि मौजे उमरकांचन गावचा पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी निकालात काढू.महात्मेवाडी गावातील ४६ कुटुंबांची घरे पाण्याच्या कडेला आहेत. याबाबत जलसंपदा विभागाने पाण्याची रेषा अंतिम करावी. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांकडून शपथ पत्र घेऊन भूखंडांचे वाटप करावे. मौजे कुशी गावातील लोकांना नागरी सुविधा पुरविल्या जातील,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)