सातारा : रस्त्यात असणारा अडथळा रीतसर दूर केला जात नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वखर्चाने तो अडथळा दूर करुन थेट मुख्यंमत्र्यांना त्या कामाचे फोटो पाठविण्याच्या दिलेल्या इशाºयाने प्रशासन खडबडून जागे झाले. ‘व्हॉटस अॅप’ गु्रपच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या या इशाºयाचा भलताच ‘इफेक्ट’ सातारा शहरात पाहायला मिळत आहे. त्याचे झाले असे...येथील पोवईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्त्यावर असणाºया जिल्हा परिषद चौकात ड्रेनेज धोकादायक स्थितीत ठेवण्यात आला होता. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याने नगरपालिकेनेही हात वर केलेले. हा रस्ता पोवईनाक्यापासून पुढे संगमनगरपर्यंत रुंद आहे. पण ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे जिल्हा परिषदेच्या खालच्या चौकातच असणाºया या ड्रेनेजच्या खड्ड्यावर लोखंडी जाळी टाकून चहू बाजूंनी मोठाले दगड ठेवण्यात आले होते. या ठिकाणी चार रस्ते मिळतात. तसेच बँक, दवाखाने, शाळा, महाविद्यालये, जिल्हा परिषद इतकेच काय नेत्यांची ये-जा असणारे विश्रामगृह देखील जवळच असल्याने या रस्त्यावर मोठी रहदारी असते. रात्रीच्यावेळी या खड्ड्याभोवती ठेवलेले दगड दिसत नसल्याने अनेक जण ठेचकळून पडले होते. त्यात या खड्ड्याभोवती चिखलाचे साम्राज्य साठलेले. अनेकदा दुचाकी वाहनेही याठिकाणी अडकून पडत होती. तसेच पादचाºयांनाही त्रास होत होता. मानवनिर्मित अडथळा दूर होत नव्हता. बांधकाम विभाग याबाबत गांभीर्याने घेत नसल्याने संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेचे चिन्मय कुलकर्णी यांनी भलतीच युक्ती राबविली. त्यांनी पे्रस नावाच्या व्हॉटस अॅप गु्रपवर ही परिस्थिती मांडली. ‘जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानापासून पोवईनाक्याकडे जाताना जिल्हा बँकेसमोर गेल्या कित्येक दिवसांपासून रस्ता बंद ठेवलाय व त्याच्या बाजूला मोठ मोठे दगड लावलेत व ही परिस्थिती नैसर्गिक नसून मानवनिर्मित असून येथे वाहतूक भरपूर असते. या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे ४ दिवसांत येथील परिस्थिती सुधारली नाही तर मात्र आम्हाला आमची व प्रवाशांची काळजी म्हणून स्वखर्चाने काम करुन मुख्यमंत्र्यांना त्याचे फोटो पाठवावे लागतील,’ असा इशारा दिला. दरम्यान, यानंतरही कुलकर्णी यांनी पाठपुरावा सुरुच ठेवला. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना भेटून परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. तसेच चार दिवसांची मुदतही दिली. त्यानंतर आम्हीच काम करुन त्याचे फोटो मुख्यमंत्र्यांना पाठवू, असे सांगितल्याने बांधकाम विभागाने तत्काळ कार्यवाही करत या खड्ड्याभोवती बॅरिगेटस उभे केले. खड्ड्याच्या बाजूला असणारे दगड देखील काढून बाजूला टाकण्यात आले. हे काम सुरु झाल्याने रस्त्याचे रुंदीकरण शक्य होणार आहे.बांधकाम विभागाने हे काम हाती घेतले नसते तर लोकांच्या रक्षणासाठी आम्ही ते स्वखर्चाने करणार होतो. व्हॉटस अॅप गु्रपवर दिलेला हा इशारा भलताच लागू पडला आहे.- चिन्मय कुलकर्णी |
‘व्हॉटस अॅप’ वरील इशाºयाने प्रशासनाची पळापळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 5:06 PM
सातारा : रस्त्यात असणारा अडथळा रीतसर दूर केला जात नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वखर्चाने तो अडथळा दूर करुन थेट मुख्यंमत्र्यांना त्या कामाचे फोटो पाठविण्याच्या दिलेल्या इशाºयाने प्रशासन खडबडून जागे झाले. ‘व्हॉटस अॅप’ गु्रपच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या या इशाºयाचा भलताच ‘इफेक्ट’ सातारा शहरात पाहायला मिळत आहे.
ठळक मुद्देरस्त्यावरील काम स्वखर्चाने करण्याचा इशारामुख्यमंत्र्यांना त्याचे फोटो पाठविण्याचा दिला होता इशारासातारा शहरात इशाºयाचा भलताच ‘इफेक्ट’ प्रशासन खडबडून जागे झाले