शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जाहिरात तुमची.. जीव जातोय आमचा!

By admin | Published: June 26, 2015 11:22 PM

होर्डिंगचं दुखणं : सार्वजनिक ठिकाणी घुटमळतोय मृत्यू

सागर गुजर - सातारा --राजवाडा बसस्थानकात लावलेले लोखंडी होर्डिंग कोसळल्याने युवती गंभीरीत्या जखमी झाली. यानंतर गर्दीच्या ठिकाणी लावलेल्या होर्डिंगचा प्रश्न आ वासून समोर आला आहे. होर्डिंग लावलेल्या ठिकाणी उभे राहण्याचे धाडसच होत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून यायला लागल्या आहेत.गजबजलेल्या ठिकाणी अजस्त्र जाहिरातींचे होर्डिंग लागलेले पाहायला मिळतात. विशेषत: बसस्थानके, गर्दीचे चौक, मुख्य रस्ते यासाठी निवडले जातात. या होर्डिंगसाठी लोखंडी अँगल, गज यांचा वापर केला जातो. या होर्डिंग्जवर चमकदार जाहिराती झळकत असल्या तरी त्या ज्यावर उभ्या आहेत, त्यांचे गज व अँगल गंजलेले असतात. त्याचे फाउंडेशनही दर्जेदार पद्धतीने केलेले नसते. खाली उभ्या नागरिकांची, व्यावसायिका, वाहनधारकांची सुरक्षा रामभरोसे असते. वादळी वाऱ्यामुळे अशा प्रकारच्या होर्डिंग्जना धोका असतो. पुणे-बंगलोर महामार्गावरही काही दिवसांपूर्वी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे असे होर्डिंग्ज भुईसपाट झाले होते. यात व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले; पण तरीही पुन्हा असे होर्डिंग्ज पुन्हा उभे राहिले. मुख्य प्रश्न असतो तो लोकांच्या सुरक्षेचा गर्दीच्या ठिकाणी व्यवसायाची जाहिरात होते. त्यामुळे आपोआप उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळते; मात्र ही जाहिरात पाहणारे ती उत्पादने खरेदी करण्यासाठी जिवंत तरी राहिले पाहिजेत. याचा विचार करून होर्डिंग्ज व्यावसायिकांनी असे फलक उभे करावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या आपल्या सग्या-सोयऱ्यांच्या सुरक्षेच्या काळजीने घरच्यांची गाळण उडते आहे, याचा तरी विचार करावा, मृत्यू कुठल्याही वाटेने येऊन प्रत्येकाला गाठणार आहे, तो चुकणार नाही, हे जरी सत्य असले तरी कृत्रिम बाबींपासून सुरक्षित राहता येऊ शकते. दुर्लक्ष केले तर हा मृत्यू तुमच्या-आमच्या जवळच घुटमळतो आहे. दरम्यान, असुरक्षित होर्डिंगचा फायदा संबंधित जागा मालकांना मिळतो; पण त्यापासून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जागा मालकाची असते. जाहिरात उभी करण्याबाबत केलेल्या करारात ही जबाबदारी जागा मालक संबंधित जाहिरात फलक उभे करणाऱ्यांवर टाकतात. गुरुवारच्याच घटनेत कारवाई करण्याच्या संदर्भाने हालचाली तत्काळ झाल्या नाहीत. एस.टी.च्या जागेत असणारे होर्डिंग्ज पडला. त्यात मुलगी जखमी झाली. पण घटनेमागची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही, असे दिसते. याप्रकरणी आणखी काही दिवस चर्चा होईलही पण कायमची उपाययोजना करण्याची गरज आहे. एस.टी., एलआयसीची कर चुकवेगिरीएस. टी. व एलआयसी या दोन महामंडळांचे जाहिरात कर पालिकेकडे जमा होत नाहीत. स्वत:च्या जागेत होर्डिंग आहेत, मग त्याचा कर पालिकेला का भरायचा?, असा त्यांचा दावा आहे. मात्र, पालिकेच्या म्हणण्यानुसार खासगी जागेवर जरी जाहिरात फलक उभा करायचा झाल्यास त्याचा जाहिरात कर पालिकेत जमा करणे आवश्यक आहे.महाविद्यालयात येण्यासाठी आम्हाला एस.टी. बस स्थानकावर थांबावेच लागते. त्याला पर्याय काय? पण, आता होर्डिंगच्या खाली उभे राहणे धोकादायक वाटते. काही दिवसांपूर्वी एस.टी. बसस्थानकातील स्लॅब कोसळला होता. त्यामुळे आता कुठेही असुरक्षित वाटत राहते.- अनिकेत जोशी, सातारागजबजलेल्या ठिकाणी होर्डिंग्ज लावणे अपरिहार्य असले तरी लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. ज्या ठिकाणी असे होर्डिंग्ज आहेत, त्या ठिकाणी सुरक्षा घेतली जावी. लोकांचा जीव इतका स्वस्त नाही की, तो सहज जावा. त्यामुळे ज्यांच्या जागेत अशी होर्डिंग्ज आहेत, त्यांनी लोखंडी अँगल गंजलेले आहेत का? याची तपासणी करावी. - तेजस शिर्के, सातारा