सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे व पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवून रस्त्यावर सोयाबीनचा सडा घातला. सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रेही सुरू केली असली तरी या ठिकाणच्या जाचक अटी शर्तींमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतकºयांत असलेला असंतोष लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व इतर कार्यकर्ते सोयाबीनची पोती घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाले.शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक असल्याने या बैठकीला पालकमंत्री शिवतारे, तसेच जानकर यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच त्यांच्या वाहनांवर सोयाबीनची पोती रिकामी करण्यात आली. अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. या गोंधळातच दोघेही मंत्री वाहनातून खाली उतरले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शेतकºयांच्या सोयीसाठी नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. शेतकºयांनी चांगल्या प्रतीचे सोयाबीन केंद्रावर घालणे अपेक्षित आहे, नाहीतर शासनाचेच नुकसान होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, यंदा जास्त पाऊसझाला. उताराही जास्त असल्याने सोयाबीनचे उत्पादन सरासरीपेक्षा वाढलेले आहे. त्यामुळे उत्पादनाची अट काढून सरसकट सोयाबीन खरेदी करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केली. त्यावर शेतकºयांची बाजू सरकारपुढे मांडण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
साताऱ्यात सोयाबीन दरासाठी अडविल्या मंत्र्यांच्या गाड्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 1:04 PM
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे व पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवून रस्त्यावर सोयाबीनचा सडा घातला
ठळक मुद्देसाताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलनजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतली सोयाबीनची पोतीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शासनाचा निषेध