आदर्की : फलटण तालुक्यातील शेवटचे टोक आदर्की खुर्द गावच्या रस्त्यावर १९९६ मध्ये डांबरीकरण झाले होते. त्यानंतर तब्बल २५ वर्षांनंतर मागासवर्गीय वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण, मुरमीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांच्याहस्ते करण्यात आले.
फलटण तालुक्याचे शेवटचे टोक आदर्की खुर्द गाव असून, फरशी पुलाचे काम तत्कालीन आमदार चिमणराव कदम यांच्या प्रयत्नातून झाल्याने गाव मुख्य रस्त्याशी जोडले; पण रस्ता कच्चा असल्याने वाहने पावसाळ्यात बाहेर थांबवावी लागत होती. १९९६ मध्ये तत्कालीन खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या खासदार फंडातून एसटी स्टँड ते मागासवर्गीय वस्तीपर्यंत खडीकरण डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत निधीतून निष्णाई मंदिराभोवती व मुख्य चौकापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. परंतु मागासवर्गीय वस्ती, रामोशी आळीकडे डांबरीकरण केले नव्हते. आता जिल्हा परिषद शाळा ते मारुती मंदिरापर्यंत डांबरीकरण होणार आहे. परंतु मारुती मंदिर ते काकडे दुकानापर्यंत खडीकरण, मुरमीकरण होणार असल्याने २५ वर्षांनतर मागासवर्गीय वस्ती, रामोशी आळी खडीकरण होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या उद्घाटनास जिल्हा बँकेचे संचालक विश्वासराव निंबाळकर, टाकोबाईचीवाडीचे सरपंच कुणाल झणझणे, विशाल झणझणे, माजी सरपंच दिवाकर निंबाळकर, माजी सरपंच सतीश निंबाळकरसह सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
१९आदर्की
फोटो -आदर्की खुर्द (ता. फलटण) येथे खडीकरणाचे काम सुरू आहे.