शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Satara: दमदार सुरुवातीनंतर पाऊस थांबला; खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 12:59 IST

पावसाने जूनमधील उच्चांकही मोडला, कोयनेला एक मिलिमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आठवडाभर दमदार पाऊस झाला; पण दोन दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर आणि महाबळेश्वर येथे एक तर नवजाला फक्त दोन मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर पावसाच्या उघडिपीमुळे खरीप हंगाम पेरणीला वेग येणार आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षांत मान्सूनचा पाऊस १० जूननंतरच दाखल झाला; पण यंदा मान्सूनची सुरुवात लवकर झाली. ६ जूनपासूनच जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. पश्चिम भागात नेहमीच दमदार हजेरी लावणारा पाऊस पूर्वेकडेही झाला. त्यामुळे पावसाने सर्वांनाच सुखावून सोडले आहे. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात सुरुवातीला धुवाधार पाऊस पडला. यामुळे ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे. तसेच भात खाचरातही पाणी साचले आहे. सध्या भात लागणीची गडबड सुरू झाली आहे. तर पूर्व दुष्काळी भागात यंदा जूनमध्येच सलग आठ दिवस पाऊस पडत होता. त्यामुळे पावसाने जूनमधील उच्चांकही मोडला आहे. या पावसामुळे बहुतांशी गावच्या ओढ्यांना पाणी वाहिले. शेतजमिनीत पाणी साचले. त्यामुळे खरीप हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.सध्या काही ठिकाणी पेरणीही सुरू आहे. तर पावसामुळे बंधारे भरले आहेत. तसेच विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडणार नाही.मान्सून दाखल होऊन ११ दिवस होऊन गेले आहेत. सुरुवातीला दमदार पाऊस पडला असलातरी सध्या उघडीप आहे. त्यामुळे पेरणीला वेग येणार आहे; पण पावसाची ही दडी कायम राहिली तर शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण होणार आहे.नवजाला ३१३ मिलिमीटर पर्जन्यमान..जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पावसाची उघडीप आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वरला फक्त एक मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून कोयनानगर येथे २६१ आणि नवजाला सर्वाधिक ३१३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला आतापर्यंत २३८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात अजून पाण्याची आवक सुरू नाही. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात १४.८७ टीएमसी पाणीसाठा होता. टक्केवारीत हे प्रमाण १४.१३ इतके आहे. तर जिल्ह्याच्या इतर धरणक्षेत्रातही पावसाची उघडीप आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसfarmingशेती