शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

उदयनराजेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:08 PM

सातारा : सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांनी आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सकटे यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी ...

सातारा : सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांनी आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सकटे यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणाच्या निषेधार्थ पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसह एकूण ३०० कर्मचाºयांनी सोमवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात घंडागाडी चालक-मालक सहभागी झाल्याने घरातील कचरा संकलित होऊ शकला नाही. खा. उदयनराजे भोसले यांनी संबंधित नगरसेवकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.सदर बझार परिसरात एक डुक्कर मृत अवस्थेत आढळून आले होते. हे डुक्कर तातडीने न उचलल्याने शनिवारी सकाळी नगरसेवक विशाल जाधव यांनी दिवशी सकटे सदर बझार येथील हजेरी कार्यालयात येऊन दिलीप सकटे यांना दमदाटी व शिवीगाळ केली होती. तसेच बायोमेट्रिक मशीनची तोडफोडही केली होती.या घटनेच्या निषेधार्थ सफाई कर्मचाºयांनी केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी विशाल जाधव यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या घटनेला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी अखिल महाराष्ट्र कर्मचारी संघाच्या वतीने कामबंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी व घंटागाडी चालक-मालक यांच्यासह पालिकेतील सुमारे ३०० कर्मचाºयांनी कामबंद आंदोलनकेले.दुपारी खा. उदयनराजे पालिकेत दाखल झाले. यावेळी त्यांनी चुकीच्या गोष्टींना अजिबात थारा देणार नाही, असे सांगून पुरावा मिळाल्यास विशाल जाधव यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर कर्मचाºयांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, सभापती मनोज शेंडे, यशोधन नारकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सुमारे दहा टनकचरा घरीच पडूनपालिकेच्या वतीने शहरातून दररोज सुमारे ७० टन कचरा गोळा केला जातो. या आंदोलनात ८० घंटागाडी चालक व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे कोणत्याही प्रभागात घंटागाडी फिरकली नाही. त्यामुळे दररोज घरातून संकलित होणारा सुमारे १० टन कचरा गोळा झाला नाही.