सातारा : लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवेंद्रसिंहराजे आणि नरेंद्र पाटील यांनी हॉटेलात मिसळ खाल्ली होती. त्याचा ठसका अनेकांना बसला. त्यानंतर रविवारी पुन्हा दोघांनीही त्याच हॉटेलात येऊन ‘चाय पे चर्चा’ केली. यावेळी पाटील यांनी सातारा-जावळीचा खरा राजा शिवेंद्रराजेच असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगत एकप्रकारे आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली.सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मैत्री सर्वश्रूत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी तर ही मैत्री अधिक दृढ होत गेली. या निवडणुकीच्या काळात दोघांनी साताऱ्यातील एका हॉटेलात एकत्र येत झणझणीत मिसळ खाल्ली होती. त्यामुळे या मिसळीचा अनेकांना ठसका बसलेला. त्यामुळे निवडणुकीत काय-काय होणार, याचा अंदाज बांधला जात होता. तर आता हे दोघेही पुन्हा साताºयातील त्याच हॉटेलात एकत्र आलेले दिसले.रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आमदार शिवेंद्रसिंहराजे, नरेंद्र पाटील हॉटेलात एकत्र दिसून आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय काटवटे, सातारा शहर उपाध्यक्ष आप्पा कोरे हेही होते. शिवेंद्रसिंहराजे आणि पाटील यांनी पाऊस पडत असताना व थंडगार वातावरणात गरमागरम चहा घेतला. यावेळी दोघांत बराचवेळ चर्चा झाली. राजकीय आणि सातारा विधानसभा मतदारसंघाबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. जवळपास पाऊण तास दोघांनी ही चर्चा घडवली. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात काही तरी घडतंय-बिघडतंय असाच संदेश यातून गेला.रविवारच्या या ‘फें्रडशिप डे’च्या शुभेच्छाची दिवसभर राजकीय वातावरणात चर्चा सुरू होती. तर ‘चाय पे चर्चा’ झाल्यानंतर दोघांनीही पत्रकारांशी संवाद साधला. चर्चेत काय झाले, याचा तपशीलही कथन केला.विकासाच्या मार्गावर जाताना वाईट वाटून घेऊ नकाआम्ही ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने एकत्र आलो. यामुळे आमची मैत्री आणखी घट्ट झालीय. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे चाललोय. आम्ही विकासासाठीच वेगळा मार्ग धरलाय. त्याचं कोणी वाईट वाटून घेऊ नये. जिल्ह्यासाठी आम्ही दोघंही मित्र म्हणून चांगलं काम करू. मी दहा वर्षे सातारा-जावळीचा आमदार आहे. येथील मतदार माझ्यावर विश्वास दाखवतील, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कोणत्याही मतदारसंघातून लढण्यासाठी तयारफे्रंडशिप डे’च्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. चाय पे चर्चा झाली असून, विकासाच्याही दिशेने जाण्यासाठीही बोललो. सातारा-जावळीतील खरा राजा हे शिवेंद्रसिंहराजे हेच आहेत. किती फॉर्म आले, त्याला अर्थ नाही. आता जिल्हाच केसरीमय होणार आहे. पक्षाने विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत काही सांगितलं नाही; पण वरून आदेश आला तर कोणत्याही मतदारसंघातून लढण्यास तयार आहे, असे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
मिसळनंतर ‘हॅपी फ्रेंडशिप डे’ म्हणत ‘चाय पे चर्चा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:01 AM