सातारा : गत दोन महिन्यांपासून रात्रंदिवस नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करणाऱ्या पोलिसांची आता धावपळ थांबलीय. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे थोडी का होईना पोलिसांना आता विश्रांती मिळू लागलीय.देशात २४ मार्चला संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्याच दिवसापासून जिल्ह्यातील पोलीस खºया अर्थाने कोरोनाच्या रणांगणात उतरले.
महाराष्ट्रभर कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, पुढील दोन आठवडे साताºयात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून येत नव्हता. अशा परिस्थितीतही सातारा पोलीस नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचे, घरात बसण्याचे आवाहन करत होते. परंतु ज्या दिवशी साताºयात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्या दिवसापासून पोलिसांनी प्रचंड मेहनत घेऊन रस्त्यावर गस्त सुरू केली. रात्रंदिवस पोलीस शहरातून फेरफटका मारत होते. बिनकामी रस्त्यावर एखादा फिरताना दिसल्यास वेळ पडल्यास त्याला लाठीचा प्रसादही देण्यास पोलीस मागे-पुढे पाहत नव्हते.
अनेकांनी ठिकाणी पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद दिला होता. त्यामुळे पोलिसांवर सर्व स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला. परिणामी पोलिसांच्या हातातील काठी अचानक गायब झाली. दोन महिन्यांपासून पोलिसांना कसल्याही प्रकारची उसंत मिळत नव्हती. परंतु आता लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे पोलिसांना थोडी विश्रांती मिळत आहे. पोलिसांना आता त्यांच्या घरी जाता येत आहे. ही संधी असली तरी पोलिसांना धोका मात्र अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे.
काहींनी वाचन तर काहींचा व्यायामावर भर...लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे पोलिसांना आता वेळ मिळू लागलाय. यावेळेचा अनेकांनी चांगला फायदा उठविण्याचा निर्णय घेतलाय. काहींनी वाचनावर भर दिलाय तर काहींनी स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष दिलंय. रोज सकाळी व्यायाम करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याकडे अनेकांचा कल आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने व्यायामापेक्षा वाचन करण्यास अनेकांची पसंती आहे.
जनतेकडून स्वागत..संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन झाल्यापासून पोलिसांना अनेक दिव्यातून जावे लागत आहे. कोरोनाच्या रुपाने साक्षात मृत्यू समोर उभा असताना खंबीरपणे जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस लढत आहेत. जनतेकडून होणारे स्वागत पाहून पोलिसांची छाती अभिमानाने फुलून जातेय.
आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून ड्यूटीवर आहे. काही दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे थोडीफार विश्रांती मिळतेय. मात्र, आम्हाला धोका कायम आहे. लोकांना सांगूनही लोक ऐकत नाहीत. याचे आम्हाला वाईट वाटते. आम्ही कोणासाठी रस्त्यावर उभे आहोत, आपल्याच सुरक्षिततेसाठी. मग तुम्ही काही दिवस घरात बसा ना.- एस. भोसले, पोलीस कर्मचारी