फलटण : सांगवी (ता. फलटण) येथील शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील सातव्या सत्रातील कृषिदूत आकाश बेलदार याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान मोबाईलद्वारे कसे वापरावे, या विषयाच्या नवीन ॲप्सची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी शेती आधारित प्रात्यक्षिक सादर करणे, शेतजमीन व्यवस्थापन व पीक उत्पादन या विषयांवर आधारित तसेच शेतीआधारित केव्हीके ॲप, किसान एक्स्प्रेस, कृषी विक्रेता, ईफ्को किसान, अपनी खेती, डाळिंब तंत्र, ई-कल्प, प्लांटिक्स, कृषी ज्ञान, मार्केट यार्ड ॲप यांसारख्या अनेक उपयुक्त ॲप्सची माहिती व त्यांचा वापर आणि उपयोग यासोबतच शेतीतील तण नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती प्रात्यक्षिकांसह करून दाखविण्यात आली. शेतीच्या समस्या व विविध अडचणींवर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यासारख्या विविध विषयांवर चर्चासत्रे घेऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. एन. एस ढालपे, प्रा. ए. एस. नगरे, प्रा. एस. वाय. लाळगे, प्रा. व्ही. पी. गायकवाड, प्रा. जी. एस. शिंदे, प्रा. एन. ए. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची माहिती देण्यात आली.
यावेळी सांगवी गावचे माजी उपसरपंच दीनानाथ बेलदर-पाटील, प्रगतशील शेतकरी संदीप फडतरे, प्रल्हाद गुरव, संग्राम जगताप, दिलीप भगत, शंकर फडतरे, समीक्षा जगताप, लोचना फडतरे, कल्पना फडतरे, यशोदा जगताप, छाया फडतरे, आदी शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.
फोटो आहे..