शेंद्रे : सातारा तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या शेंद्रे ग्रामपंचायत निवडणुकीत कै. अशोकराव मोरे विचारमंचच्या अजिंक्य पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत ११ जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवले, तर ग्रामविकास पॅनेलला फक्त तीन जागांवर विजय मिळवत समाधान मानावे लागले.
अजिंक्य पॅनेलमधून प्रभाग क्रमांक १ मधून सागर पोतेकर(३३४), मनीषा क्षीरसागर (३५६), स्वाती पडवळ(३२०), प्रभाग क्रमांक ३ मधून श्रीरंग वाघमारे(४८८), पूनम जाधव (४७७), प्रभाग क्रमांक चारमधून अस्लम मुलाणी (२६६), सोपान भोसले (२४३), रेखा पडवळ (२३७) मते मिळविली, तर ग्राम विकास पॅनेलमधून मारुती पडवळ (२७७), पाकिजा मुलाणी (२६५), सारिका बर्गे (२६५) मते मिळविली.
अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी युवा उमेदवारांना व युवा नेतृत्वाला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. सर्व विजयी उमेदवारांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले, अमर मोरे व गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारच्या निकालाकडे संपूर्ण शेंद्रे गटाचे लक्ष लागून होते. या प्रभागात अजिंक्य पॅनेलचे तिन्हीही उमेदवार १०० मतांपेक्षाही जादा फरकाने विजयी झाले आणि पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक चार हा अजिंक्य पॅनेलचा बालेकिल्ला अभेद्य राहिला.
१८शेंद्रे
फोटो :
सातारा तालुक्यातील शेंद्रे ग्रामपंचायतीत अजिंक्य पॅनेलने यश मिळविल्यानंतर अजिंक्यतारा साखर कारखान्यावर विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला.