शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

अजित पवार यांनी शरद पवारांना रायगडावर जायला भाग पाडले, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By दीपक देशमुख | Published: February 25, 2024 2:38 PM

Devendra Fadnavis News: राष्ट्रवादीचे खा. शरद पवार चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेले, याचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यावे लागेल. त्यांना चाळीस वर्षानंतर का होईना छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे लागले, याचा मनस्वी आनंद असल्याचा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

- दीपक देशमुखसातारा : राष्ट्रवादीचे खा. शरद पवार चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेले, याचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यावे लागेल. त्यांना चाळीस वर्षानंतर का होईना छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे लागले, याचा मनस्वी आनंद असल्याचा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

सातारा येथे खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, अतुल भोसले, सुनील काटकर आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, देशाची परिस्थिती नव्हे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केले असते तर त्यांची अशी बिकट परिस्थिती झाली नसती, असे सांगत त्यांनी पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

विरोधकांचा ईव्हीएम मशीनला आक्षेप असल्याबात फडणवीस म्हणाले, विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते व हरतात तेव्हा ईव्हीएम मशीन खराब असते. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्याचे आव्हान दिले होते. परंतु, कुणीही ते स्वीकारू करू शकले नाही. हरण्याची मानसिकता झाली की त्यांना ईव्हीएम मशीन आठवते.

भाजपने आपणास वापरून फेकून दिल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. यावर फडणवीस म्हणाले, त्यांच्या मनासारखे झाले नाही तर ते आम्हाला शिव्या देतात. परंतु, आम्ही मोठा भाऊ असल्याने शांतपणे ऐकून घेतो.

पुणे जिल्ह्यात अंमली पदार्थांचे रॅकेट संपवायचे असेल तर राजकीय हेवेदावे सोडून मदत करायची तयारी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहे. याबाबत विचारले फडणवीस म्हणाले, याबाबत पोलिसांनी कठोर भुमिका घेतली आहे. सुप्रिमा सुळे या मदत करत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. बावनकुळे यांनी छोटे-छोटे पक्ष संपवा, असे कुठेही म्हटले नसल्याचे सांगत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नका, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

सातारा लोकसभेबाबत उत्सुकता तशीचलोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचा निर्णय व्हायचा आहे. याबाबत चर्चेची पहिली फेरी झालेली आहे. अजून एकदोन फेऱ्या झाल्यानंतर याचा अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे. जागा वाटपानंतर उमेदवारीचा निर्णय घेण्यात येणार आहे. सातारा लोकसभेची उमेदवारी कोणाची, हे योग्य वेळी सांगण्यात येईल. माझ्यासारख्या नेत्यांनी याबाबतची अटकळ बांधणे चुकीचे होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा लोकसभेच्या उमेदवारीची उत्सुकता कायम ठेवली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारsatara-pcसातारा