सातारा : बेधडक, सडेतोड वक्तव्यामुळे आणि आपल्या कार्यपद्धतीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी चर्चेत असतात. एखादे काम आवडले नाही तर अधिकाऱ्यांची जागीच कानउघाडणी केल्याचेही आपण अनेकदा पाहिले आहे. अशीच घटना साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी घडली. अजितदादांनी विश्रामगृहाच्या बांधकामावरुन अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर या कामाची चौकशी लावणार असल्याचा दमच दिला.साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी विश्रामगृहाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी खोल्यांमध्ये बसवण्यात आलेले बेड, लाईटचे स्पॉट आदी कामावरुन नाराजी व्यक्त केली. इतकच नाही तर, चक्क स्वच्छतागृहात जात तेथील कामाची देखील पाहणी केली. यानंतर भर सभेत स्टेजवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी करत हे कामच आवडले नसल्याचे त्यांनी सांगितले. नुतन शासकीय विश्रामगृह चेंबरी.. त्या चेंबरीचा पार चेचाच करून टाकला आहे”, असेही म्हणाले.
जनतेच्या टॅक्सचा पैसा, ती कामं तरी चांगली करातर, अधिकाऱ्यांना सूचक शब्दांत इशारा देत “त्या बांधकामाची चौकशी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांना म्हणाले, बाबांनो, तुम्हाला आम्ही दीड लाख कोटी रुपये पगार आणि निवृत्ती वेतन देतो. आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या टॅक्सचा तो पैसा असतो. ती कामं तरी चांगली करा. “कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला तर नरकातच जावं लागेल असा जणू शापच दिला.मुंबईला पोहोचेपर्यंत इथं काहीतरी तुटलेलं असायचंलोकांनी पण म्हटलं पाहिजे की खरंच त्या सरकारच्या काळात हे काम एक नंबर झालं. नाहीतर आम्ही मुंबईला आमच्या घरी पोहोचेपर्यंत इथे काहीतरी तुटलेलं असायचं. मग कारवाई नको का करायला? चांगलं काम केल्यानंतर तुमचं कौतुकही करेन ना”, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावलं.