चाफळ : ‘विधानसभेच्या पराभवाची पाटणकरांची खंत २०१९ मध्ये भरून काढण्याची तयारी केली आहे. नुसती पोपटपंची करून विकास होत नाही. त्यासाठी धमक असावी लागते. ती धमक पाटणच्या विद्यमान आमदारांकडे नाही,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
चाफळ येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृत महोत्सव वर्ष प्रारंभप्रसंगी बुधवारी मेळावा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार नरेंद्र पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घाडगे, सारंग पाटील, वसंतराव मानकुमरे, राजेश पाटील, सुजित पाटील, सभापती उज्ज्वला जाधव, बाजार समितीचे उपसभापती दादासाहेब यादव उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘दुर्गम पाटण तालुक्यातील गावागावांत विकासाची गंगा पाटणकरांनी पोहोचवली. राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.’विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘तरुणांनी फसवणाºयांच्या मागे न लागता राष्ट्रवादीची ताकद मजबूत करून २०१९ ची तयारी अशी करा की विरोधकाला थेट साताºयाच्या घरी पाठवण्याची सोय होईल.’सत्यजित पाटणकर, आमदार नरेंद्र पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. विक्रमसिंह पाटणकर यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन प्रा. दीपक डांगे- पाटील यांनी केले. रुपाली पाटील, चंद्रकांत देशमुख, शिवाजीराव पाटील, सरपंच विनोद कदम यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच, सदस्य उपस्थित होते. सभापती राजेश पवार यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब यादव यांनी आभार मानले.रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसादचाफळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यानिमित्त निसरे फाटा ते चाफळपर्यंत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये तरुणांसह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी तरुणांच्या घोषणाबाजीने संपूर्ण चाफळ परिसर दणाणून गेला होता.जनतेला देशोधडीला लावण्याचे काम!राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिवाभावाचे सहकारी म्हणून विक्रमसिंह पाटणकर यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे. महापुरुषांची नावे घेऊन भावनिक राजकारण करणारा भाजप हा जातीयवादी पक्ष सामान्य जनतेला न्याय देणार नाही. राज्यावर कर्ज करणाºया या भाजप सरकारला हाकलून देण्याची वेळ आली आहे. राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार केवळ सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचे काम करत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याची दुर्दशा झाली आहे, अशी टिका अजित पवार यांनी केली.फडणवीस नव्हे ‘फसवणूक’ सरकार !सध्याचे भाजप, शिवसेना सरकार शेतकºयांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांची उघडपणे फसवणूक करीत आहे. हे फडणवीस नव्हे तर ‘फसवणूक सरकार’ आहे. भाजप, शिवसेना शासनाला पश्चिम महाराष्ट्राची अॅलर्जी झाली असल्यामुळेच जनहिताच्या प्रकल्पांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.सध्याच्या शासनकर्त्यांना सत्तेची धुंदी चढली आहे. ती धुंदी लवकरच उतरेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.