लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : येथून जवळच असलेल्या कण्हेर धरणात मित्रांसमवेत पोहायला गेलेला स्वराज संभाजी माने- देशमुख (वय २३, रा. अकलूज, सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा), हा भावी डाॅक्टर बुडाला. ही घटना शनिवारी दुपारी २:३० वाजता घडली आहे. रेस्क्यू टीमकडून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला.
अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त सर्व काॅलेज व शाळांना शनिवारी सुटी असल्याने येथील एका मेडिकल कॉलेजचे दहा विद्यार्थी कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेले होते.त्याच्यासमवेत दोन मुले पोहत धरणात दूरवर गेली. धरणाच्या मधोमध गेल्यानंतर तिघेही मुले परत निघाली. मात्र, त्यावेळी स्वराजला दम लागला. तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या मित्रांनाही दम लागल्याने त्यांनी किनारा गाठला.
त्याचा हा फोटो अखेरचा ठरलास्वराज धरणात पोहण्यासाठी उतरल्यानंतर त्याच्या एका मित्राने त्याचा फोटो काढला. अगदी उत्साहात तो धरणात पोहण्यासाठी उतरला. काठावर बसलेल्या काही मित्रांनी ‘त्या’ तिघांना चिअरअपही केले. तो वेगाने पोहत धरणाच्या मधोमध गेला; पण परत आलाच नाही. मित्राने काढलेला त्याचा तो फोटो अखेरचाच ठरला.