पाटण येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुंदरगडावर काळ्या कातळात खोदलेली भव्य ‘तलवार’ आकाराची विहीर आहे. या विहिरीतच मधोमध शंकराचे ‘शिवलिंग’ असलेले मंदिर आहे. या मंदिराच्या अगदी वर ‘गजलक्ष्मी’ हत्ती कोरलेला आहे. यावरून या विहिरीला ‘गजलक्ष्मी तलवार विहीर’ म्हटले जाते. या तलवार विहिरीच्या पात्यापासून विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्यांवरून विहिरीत उतरले की डाव्या बाजूला ‘शिवलिंग’ असलेले शंकराचे मंदिर आहे. इतिहासातील कलेचा अद्भुत नमुना असणारी ही विहीर सुंदरगडाचे आकर्षण आहे. या विहिरीत असलेल्या सुंदरेश्वर शिवमंदिरात शिवभक्त मावळ्यांनी महाशिवरात्री उत्सव साजरा केला. या मंदिरातील शिवलिंगावर पंचामृत अभिषेक, पूजा, महाआरती आणि टोळेवाडी ग्रामस्थांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला.
महाशिवरात्रीनिमित्त गजलक्ष्मी तलवार विहिरीतील सुंदरेश्वर मंदिरात शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ यावेळी भाविकांनी घेतला. किल्ल्यावर महाशिवरात्री उत्सव उत्साहात व कोरोना नियमांचे पालन करून पार पाडण्यात आला. यावेळी सुंदरगड संवर्धन समितीचे मावळे यशवंतराव जगताप, मनोहर यादव, रामचंद्र साळुंखे, लक्ष्मण चव्हाण, संदीप साळुंखे, एकनाथ साळुंखे, महाबळेश्वर ट्रेकर्सचे संस्थापक सुनील केळगणे, बावधन बगाड यात्रेचे बगाडी परमेश्वर माने, चंद्रहार निकम, शंकरराव कुंभार, अनिल बोधे, बाळासाहेब कोळी, धनंजय कोळी यांची उपस्थिती होती.
फोटो : १३केआरडी०५
कॅप्शन : सुंदरगडावर ऐतिहासिक तलवार विहिरीत असलेल्या सुंदरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.