सातारा: जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लॉकडाऊन काळातही मद्यप्रेमींनी ९२० कोटी लिटर दारू रिचवली आहे. या माध्यमातून शासनाला ११४ कोटींचा महसूल मिळाला आहे.कोरोनामुळे अनेक व्यवसायावर विपरीत परिणाम होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र दारू विक्रीवर काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश वेळा दुकाने बंद होती. मात्र तरीसुद्धा मद्यपींनी संधी साधत दारू खरेदी केली. त्यामुळे सहाजिकच शासनाच्या तिजोरीत महसूलच्या निमित्ताने भर पडली.
२०१९ च्या तुलनेत २०२०२१ या वर्षात शासनाला कमी महसूल मिळाला आहे. कोरोनामुळे बर्याचदा दुकाने बंद होती. त्यामुळे सकाळी सात ते अकरा या वेळेत घरपोच विक्रीला परवानगी देण्यात आली होती. या काळात सर्वाधिक दारू विक्री केली गेली. या घरपोच विक्रीलाही मद्यपींचा चांगला प्रतिसाद मिळाला.
बियरच्या तुलनेत देशी विदेशी मद्याची जास्त विक्री झाली आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई केल्या. यातूनही शासनाला चांगला महसूल मिळाला आहे.महसूलला दारूचा आधारजिल्ह्यात २०१९२० मध्ये दारू विक्रीतून शासनाला ६२० कोटी ७१ लाखांचा महसूल मिळाला आहे. तर २०२१ मध्ये ११४ कोटी ३७ लाखांचा महसूल मिळाला आहे. दर वर्षी उत्पादन शुल्कच्या माध्यमातून शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो.
जिल्ह्यात वर्षभरात दोनशेहून अधिक मद्यपीवर अवैद्य दारू विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अवैद्य दारू निर्मिती आणि विक्री वर नियमित कारवाई होत असल्याने वैद्य दारू विक्रीच्या माध्यमातून मिळणारा महसूल यामध्ये वाढ झाली आहे. अवैद्य दारू विक्री वर येणाऱ्या काळामध्ये ही कडक कारवाई केली जाणार आहे.- अनिल चासकर,अधीक्षक उत्पादन शुल्क सातारा
दोन वर्षांतील दारू विक्री
- २०२०-२१-११४ कोटी ३७ लाख
- २०१९-२०-६२० कोटी ७१ लाख