आदर्की : आळजापूर (ता . फलटण ) ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी ( राजे गट ) विरुध्द राष्ट्रवादी अशी दुरंगी होऊन राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शिवशक्ती उदयोग समूहाचे अध्यक्ष शंकरराव नलवडे, तालुका दूध संघाचे संचालक तुकाराम नलवडे यांच्या नेतृत्वाखालील रामराजे निंबाळकर गावविकास पॅनेलने नऊ पैकी नऊ जागा जिंकून यश मिळविले.
आळजापूर (ता . फलटण ) ग्रामपंचायत निवडणूक सलग दोन वेळा बिनविरोध झाली होती. यावेळीही बिनबिरोध निवडणूक करण्याची चर्चा सुरू होती. जागा वाटपावरून चर्चा निष्फळ ठरल्याने राष्ट्रवादीतही राजे गटातच दोन गट आमने -सामने येऊन निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शिवशक्ती उदयोग समूहाचे शंकरराव नलवडे , तालुका दूधसंघाचे संचालक तुकाराम नलवडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ( राजे गट ) प्रणित रामराजे नाईक निंबाळकर गावविकास पॅनेल तर विरोधात माजी उपसरपंच नितीन नलवडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पार्टी पुरस्कृत रामराजे महाराज ग्रामविकास अशी लढत होऊन रामराजे निंबाळकर गावविकास पॅनेलने नऊ पैकी नऊ जागा जिंकल्या. यामध्ये शुभम बापुसो नलवडे, दिलीप महिपती नलवडे, सुनील काशिनाथ पवार, सचिन शंकर मसुगडे, राजकुंवर तुकाराम नलवडे, गितांजली मनोज नलवडे, छाया जालिंदर नलवडे, पुष्पा चंद्रकांत पवार, उज्ज्वला पांडुरंग भंडलकर हे विजयी झाले.
विजयी उमेदवारांचे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, मार्केट कमिटीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, फलटण दूध संधाचे चेअरमन धनंजय पवार, प्रतिभाताई धुमाळ आदींनी कौतुक केले.
चौकट
विजयी उमेदवार फलटणहून आळजापूर येथे येताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत जे .सी. बी. तून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला
फोटो - आळजापूर ( ता. फलटण) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर विजयी उमेदवार प्रमुख कार्यकर्ते