कोरेगाव : ‘हॉस्पिटल पंढरी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, अशा कोरेगाव शहरातील लक्ष्मीनगर उपनगरातील सर्वच समस्या दर्जेदार विकास कामांद्वारे सोडविल्या जातील,’ असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
लक्ष्मीनगर येथे सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चून अंतर्गत गटर आणि रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन वैद्यकीय व्यावसायिक, व्यापारी, रहिवाशांच्या हस्ते झाले. त्यावेळी आ. शिंदे बोलत होते.
लक्ष्मीनगरचा आजवर केवळ राजकारणासाठी आणि मतांसाठी वापर झाला. मात्र, त्यांना विकासकामांद्वारे न्याय दिला गेला नाही. केवळ टक्केवारीच्या वादातून दर्जेदार विकासकामे होऊ शकली नाहीत, त्यामुळे लक्ष्मीनगरवासीयांनी राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच आहे, अशी टीका आ. शिंदे यांनी केली.
‘कोरेगाव मतदारसंघात विकासकामे करताना टक्केवारी हा शब्द विसरून जायचा आहे, कारण जनता हीच ठेकेदार असून, त्यांनी दर्जेदार, टिकावू व कायमस्वरुपी विकासकामे करण्यासाठी जागरुक राहावे,’ अशी अपेक्षाही आ. शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. वरदराज काबरा, डॉ. आदिश पाटील, डॉ. विजय झोरे, डॉ. सच्चिदानंद गोसावी, डॉ. राजेंद्र गोसावी, डॉ. सागर भंडारी, डॉ. अजित भोसले यांनी विविध विषयांच्या अनुषंगाने सूचना केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक जयवंत पवार यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास किरण बर्गे, सुनील खत्री, नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, राहुल प्र. बर्गे, राजाभाऊ बर्गे, राहुल र. बर्गे, जयवंत पवार, जयंतीलाल बहुआ, देवीचंद ओसवाल, सुरज भंडारी, राजेंद्र मेहता, श्रीनिवास खराडे, शिरीष भंडारी, किरण गांधी, रुपेश ओसवाल, महेश वाल्मिकी यांच्यासह लक्ष्मीनगर, राजीव गांधी नगर, टेक परिसरातील नागरिक उपस्थित होते.
१७कोरेगाव
लक्ष्मीनगर येथील रस्ता ट्रिमिक्स व गटार योजनेचे भूमिपूजन करताना आ. महेश शिंदे, रेश्मा कोकरे, राहुल प्र. बर्गे, राजाभाऊ बर्गे, किरण बर्गे, सुनील खत्री, जयवंत पवार व मान्यवर.