वाई: वाई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनच्या व्हॉल्व्हला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परिणामी नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. असे असतानाही पालिकेने याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांमधूून आश्चर्य व्यक्त केले जात आहेशासन पाणी वाचविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत असताना वाई नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून शासनाच्या प्रयत्नांना राजरोसपणे काळिमा फासण्याचे काम चालू आहे. ही बात गंभीर असून, त्यावर त्वरित उपाययोजना करणे गरज असताना पालिकेने मात्र अजून कोणतीही उपाययोजना केली नाही.याबात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ‘स्वच्छ वाई सुंदर वाई’ हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी हागणदारीमुक्त वाई शहर करण्याची संकल्पना आखण्यात येत असताना मुख्य पाईप लाईनच्या व्हॉल्व्हमधून होणारा बेसुमार पाण्याचा अपव्यय टाळण्यात पालिकेला अपयश येत आहे. पालिकेने संबंधित पाईपलाइनची तत्काळ दुरुस्ती करावी व पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मनसे उभारणार आंदोलन पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती निर्माण होत असताना पालिकेकडून दररोज लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी चालू आहे़ ही अतिशय निदंनीय बाब असून, या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा ‘मनसे’च्या वतीने देण्यात आला आहे.जनतेच्या माथी भुर्दंड नको...वाई शहरात लाखो लिटर पाणी वाया जात आहे, याला जबाबदार कोण? पाण्यासाठीचा वसूल करण्यात येणारा कर संबंधित आधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा जनतेच्या माथी त्याचा भुर्दंड का? असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
आधीच दुष्काळ; त्यात गळती!
By admin | Published: October 16, 2015 9:52 PM