शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

आंबेदरेची रिक्षा ठरली लोणावळ्यात अव्वल!

By admin | Published: April 12, 2017 10:49 PM

साताऱ्याचा नावलौकिक : रिक्षा फॅशन शोमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

सातारा : आंबेदरे (ता. सातारा) येथील विजय शिवाजी निकम यांच्या रिक्षाला लोणावळा रिक्षा फेडरेशन, ता. मावळ, जि. पुणे यांच्या वतीने लोणावळा येथे रविवारी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य भव्य रिक्षा फॅशन शोमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, लोणावळा या विभागांतील शेकडो रिक्षा प्रेमींनी सहभाग घेतला होता. सातारा शहरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्या विजय निकम यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला. निकम यांना रिक्षा सजावटीची आवड आहे. साताऱ्यात रिक्षा सजावटीसाठी व वेगळेपणासाठी ते पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे दहा रुपयांचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह त्यांना मिळाले. लोणावळा येथे झालेल्या स्पर्धेत रिक्षाला लावलेले सिंबॉल, मोनोग्राम, पेपर वाचनालय, प्रथमोपचार पेटी, लॅपटॉप, शुद्ध पाण्याची सोय या बाबींचा विचार करून संयोजकांनी त्यांच्या रिक्षाला प्रथम क्रमांक दिला. नेहमीचा व्यवसाय करतानाही विजय निकम यांच्या रिक्षाचा असा ‘हटके लूक’ कायम असतो. त्यामुळे साहजिकच त्यांची रिक्षा सातारा शहरात ‘फेमस’ आहे. सातारा-आंबेदरे या कच्च्या रस्त्यावर नेहमी चालवूनही त्यांची रिक्षा कायमच स्वच्छ आणि नेटकी असते. लोणावळ्यात झालेल्या स्पर्धेसाठी त्यांना काका जाधव, संतोष बाबर, संजय कोकरे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)