शिरवळ : घात-अपघातातील जखमी किंवा नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून १०८ रुग्णवाहिका सुरू केली. यामुळे वेळीच मदत मिळत आहे. पण शिरवळमध्ये अजबच प्रकार पाहायला मिळाला. रात्री साडेअकराला बोलविलेली रुग्णवाहिका चक्क पहाटे साडेतीनला प्रकटली. रुग्णाला तातडीने घेऊन जाण्याऐवजी चालकाने शिरवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.याबाबत माहिती अशी की, पुणे जिल्ह्यात वास्तव्यास असलेला व पुणे येथील एका कंपनीत कामाकरिता असलेला एक तरुणाची तब्बेत बिघडली. त्याला वैद्यकीय तपासणीकरिता सोमवारी अकराच्या सुमारास शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित तरुणाची तपासणी केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याला जिल्हा रुग्णालयात किंवा पुण्याला हलविणे आवश्यक होते. त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेला वैद्यकीय अधिकाºयांनी दूरध्वनी करून बोलविले.त्यानंतर चक्क साडेतीन तासांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली. यावेळी रुग्णवाहिकेमधील महिला डॉक्टर महिला व चालकांनी रुग्णाची पाहणी न करता शिरवळच्या वैद्यकीय अधिकाºयांशी हुज्जत घालत रुग्णाला नेणार नसल्याचे सांगत आकांडतांडव घालण्यास सुरुवात केली.
वैद्यकीय अधिकाºयांनी रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांची समजूत घालत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांच्या केबिनमध्ये येण्याची विनंती केली असता ती धुडकावत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वैद्यकीय अधिकाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांना याची माहिती देण्यासाठी दूरध्वनी केला असता रुग्णवाहिकेच्या चालक, डॉक्टरांनी मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण केले. हे उपस्थितांच्या लक्षात येताच संबंधितांना हटकले असता रुग्णाला न घेताच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेमधून काढता पाय घेतला.
रुग्णवाहिकेला बोलवले जाते त्यावेळी अत्यावश्यक सेवा मिळणे गरजेचे असते. मात्र रुग्णवाहिकेतील चालक व कर्मचारीच व्यवस्थित सेवा न देता वैद्यकीय अधिका-यांशी उद्धट वर्तन करतात. त्यामुळे संबंधित रुग्णवाहिकेत कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांवर कारवाई करण्यात यावी, ृअशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
पर्यायी रुग्णवाहिकेतून पुण्यालासंबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबतची कल्पना वरिष्ठांना दिल्यानंतर खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या प्रयत्नानंतर यंत्रणा कार्यरत झाली. दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करीत संबंधित रुग्णाला तातडीने पुणे येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले.