सातारा : महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवेत सहाय्यक सचिव पदावर साताऱ्याच्या अम्रीता राजेंद्र कायगुडे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कायगुडे यांची ही निवड झाली आहे.
त्या सध्या महावितरण कंपनीत सहाय्यक अभियंता म्हणून भुसावळ येथे कार्यरत आहेत. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजेंद्र विनायकराव कायगुडे यांच्या त्या कन्या आहेत.
कायगुडे यांचे शालेय शिक्षण साताऱ्यातील मोना स्कूलमध्ये झाले. पुढे यशवंराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. इस्लामपूरच्या राजाराम बापू इस्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी ‘बीई’ची पदवी चांगल्या गुणांनी संपादन केली. २०१८ मध्ये स्पर्धा परीक्षेतून त्यांची महावितरण कंपनीत सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली. ही सेवा करत असताना त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात त्यांनी यश मिळविले.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळावर सहाय्यक सचिव (तांत्रिक) म्हणून त्यांची राज्यपालांच्या आदेशाने नियुक्ती झाली आहे. या यशाबद्दल राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचा विशेष सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो आहे...!