सातारा : लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सातारा लोकसभा मतदारसंघात ३० इच्छुकांनी तब्बल ५५ अर्ज खरेदी केले तर राहुल गजानन चव्हाण, वानेवाडी, ता. बारामती यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला.सातारा सभेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत दिनांक १२ ते १९ एप्रिलपर्यंत आहे. पहिल्या दिवशी ३० इच्छुकांनी ५५ अर्ज खरेदी केले, यापैकी वानेवाडी, ता. बारामती येथील एका अपक्ष उमेदवार गजानन चव्हाण यांचा अर्ज दाखल झाला. अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना तीनपेक्षा अधिक वाहने आणण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पाचपेक्षा अधिक लोकांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.आतापर्यंत इंडिया आघाडीचे उमेदवारी शशिकांत शिंदे यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीकडून उमेदवाराची घोषणा झाली नाही. महायुतीकडून भाजपचे उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे नितीन पाटील, शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे अर्ज भरणार आहे, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा लोकसभेसाठी पहिल्या दिवशी अपक्षाचा एक अर्ज दाखल; उमेदवाराचे नाव काय.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 3:50 PM