शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Kaas plateau: कास पठारावर नाइट जंगल सफारीचा अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 3:09 PM

वनविभाग, कास पठार कार्यकारिणी समितीकडे जंगल नाइट सफारीमध्ये प्रवेशाचा एकमेव अधिकार आहे. झोनच्या कोणत्याही भागात पर्यटकांच्या संमतीने कोणतेही बदल करता येणार नाहीत.

सागर चव्हाण

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावरकास पठार कार्यकारी समिती आणि वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी बारमाही पर्यटनांतर्गत येत्या मंगळवारपासून नाइट जंगल सफारीचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. रात्री पर्यटनाबरोबरच रात्रगस्तीचा दुहेरी फायदा होऊन अवैध शिकार, जंगलतोडीला आळा बसणार आहे. उपक्रमाचा शुभारंभ उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या हस्ते होणार आहे.

कास पठार परिसराचे मनमोहक सौंदर्य वर्षभर अनुभवता येणार असल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नाइट जंगल सफारीच्या थराराचा आनंद घेता येणार आहे. निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, निसर्गाचे वरदान असलेले कास पठार, कास तलाव पर्यटनस्थळी परिसरात पन्नास किमीची सफर पर्यटकांना होणार आहे.

सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ आणि साडेनऊ ते साडेबारा यावेळेत नाइट जंगल सफारी होणार असून ऑनलाइन बुकिंग आहे. ओपन बोलेरो जीप ४ हजार प्रति जीप. एका जीपमध्ये जास्तीत जास्त ८ व्यक्तींना परवानगी आहे. घाटाई देवराई मार्गे, कास गाव, जुंगटी, कात्रेवाडी व्याघ्र बफर झोन, अंधारी कोळघर-सह्याद्री नगर, कुसुंबीमुरा, एकीव, नवरानवरी डोंगर मार्ग असून, ड्रायव्हर, मार्गदर्शक असल्याची माहिती माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली.

भारतीय, परदेशी नागरिकांसाठी ओळखपत्र पुरावे आवश्यक आहेत. भारतीय नागरिकांसाठी मतदार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, आरटीओ प्राप्त ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, मान्यताप्राप्त महाविद्यालय, शाळेचे विद्यार्थी ओळखपत्र, परदेशी पर्यटकांसाठी फक्त पासपोर्ट आवश्यक असल्याची माहिती उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी दिली.

कोणतीही हानी, अपघात झाल्यास पर्यटक स्वतः जबाबदार

वनविभाग, कास पठार कार्यकारिणी समितीकडे जंगल नाइट सफारीमध्ये प्रवेशाचा एकमेव अधिकार आहे. झोनच्या कोणत्याही भागात पर्यटकांच्या संमतीने कोणतेही बदल करता येणार नाहीत. केवळ अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, आग आदी आपत्कालीन परिस्थितीत कास पठार कार्यकारी समिती, सातारा-जावली वन विभागाचे संबंधित अधिकारी सफरीत बदल अथवा रद्द करतील. सफारी राइडदरम्यान कोणतीही हानी, दुखापत, अपघात झाल्यास पर्यटक स्वतः जबाबदार असतील. कास पठार जंगल नाइट सफारीचे व्यवस्थापन त्याला जबाबदार नाही.

  • नाईट जंगल सफारीस येणाऱ्या पर्यटकांना जड दिवे (टॉर्च) वापरण्यास मनाई.
  • वॉकीटॉकीचा वापर
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने जी.पी.एस. प्रणालीचा वापर
  • थंडीच्या बचावासाठी स्वेटर आवश्यक
  • कोणत्याही वन्यजीवाला त्रास होऊ नये यासाठी आरडाओरड करण्यास मनाई
  • कात्रेवाडीतील भव्य लोखंडी वॉचटॉवर.
  • स्नॅक्स, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या इतरत्र फेकून पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची दक्षता.

 

येत्या मंगळवारपासून ऑनलाइन बुकिंगद्वारे नाइट जंगल सफारीस सुरुवात होणार असून, पर्यटकांनी सहकार्य करावे. कासचे पर्यटन बारमाही होऊन आपला कोणताही त्रास वन्यजीवांना होणार नाही याची पर्यटकांनी दक्षता घ्यावी. - निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल, सातारा

वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण उद्दिष्टानुसार सर्व नियमाचे पालन करून नाईट जंगल सफारीतून पर्यटकांनी आनंद घ्यावा. वन्यजीवांना कोणताही धोका पोहोचणार नाही याची पर्यटकांनी काळजी घ्यावी. -रंजनसिंह परदेशी, वनक्षेत्रपाल, जावली

वन्य जीवांना लाभ कितीकाही सरकारी आणि काही राजकीय लोकांच्या आर्थिक फायद्यासाठी निसर्गाची हानी केली जात आहे, हे आपण दुर्दैवाने उघड्या डोळ्याने पाहात आहे. जनतेला विश्वासात न घेता नाईट सफारीचा घेतलेला निर्णयाला विरोध असेल. कारण निसर्ग आणि प्राणी याचे नुकसान कधीच न भरून येणारे असेल. - राजेंद्र चोरगे, श्री बालाजी ट्रस्ट, सवयभान, सातारा 

कास परिसरात नाईट सफारी दूरगामी परिणाम इथल्या निसर्ग समृद्धतेवर होणार आहे. सरकारी २ गाड्या आणि लोकल डझनभर गाड्या रोज फिरताना दिसतील. हॉटेल व्यवसायास चालना मिळावी, पर्यटन वाढावे हे योग्य आहे, पण हा मार्ग अयोग्य आहे आणि यास कायम विरोध हा असणारच. - डॉ. झुंजारराव कदम, पर्यावरणप्रेमी

नाईट सफारीचे प्रयोग करणारे कास हे पहिले पर्यटन स्थळ नाही. जगभरात हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. प्राणी संवर्धनासाठी हा प्रयोग यशस्वी आहे. या बरोबरच स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठीही या प्रयोगाचा लाभ होणार आहे, संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय याला विरोध करणं गैर आहे. - कन्हैयालाल राजपुरोहित, पर्यावरण प्रेमी सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारforestजंगल