ईडी ही स्वतंत्र संस्था असून त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करत असते. कोणाला वाटते म्हणून चौकशी होत नाही. याविरोधात शरद पवार कोर्टात जाणार आहेत? याबाबत छेडले असता. पवार यांचे बदल बोलण्या एवढा मी मोठा नाही, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. शनिवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे माध्यमांची अनौपचारिक गप्पा मारल्या त्या वेळी ते बोलत होते.
देशभरात फक्त विरोधकांवरच ईडीच्या कारवाया का? एकाही सत्ताधारी नेत्यावर का नाही? मोदी ईडीचा वापर विरोधकांवर हत्यार सारखा करत आहेत. त्यामुळं आता कोर्टात जाणार असल्याचं शरद पवार म्हणालेत. याबाबत माध्यमांनी छेडले असता ते बोलत होते.
उद्योगांच्या प्रतिनिधींना भेटणे म्हणजे दलालांना भेटणे, हे आदित्य ठाकरे कशाच्या आधारावर म्हणालेत? मागील सरकार मधील शिष्टमंडळ दावोस दौरा संपल्यावर मागे थांबून काय करत होते? हे उघड करावयास लावू नका, असा पलटवार देसाई यांनी केला.
परकीय गुंतवणूक आणण्यासाठी प्रतिनिधींना, गुंतवणूकदारांना नेले असल्याने त्यांना दलाल म्हणणं योग्य नाही. यापेक्षा विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी एक विधान केले होते, त्याप्रमाणे दाओसची परिषद संपल्यानंतरही शिष्टमंडळ काय करत होते, यांच्यावर आदित्य ठाकरेंनी भाष्य करावे.अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली .