वेंगुर्ले : येथील सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङमय मंडळाने १५ फेबु्रवारी २०१५ रोजी साई मंगल कार्यालय येथे वेंगुर्ले तालुका मर्यादित साहित्यिक व रसिक यांचे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. वेंगुर्लेत अनेक नामवंत साहित्यिक उदयास आले. त्यांचा वारसा पुढे चालू रहावा, रसिकांमध्ये वाङमयीन अभिरूची निर्माण व्हावी, यासाठी एक दिवशीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या साहित्य संमेलनानिमित्त १४ रोजी सायंकाळी ४ वाजता खर्डेकर महाविद्यालय ते संमेलनस्थळ अशी ग्रंथदिंडी आयोजित केली असून, याचे उद्घाटन नगरसेवक दाजी परब यांच्या हस्ते होणार आहे. १५ रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान सतीश काळसेकर हे भूषविणार आहेत. उद्घाटक म्हणून उद्योजक दादासाहेब परूळकर, स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, तर सभापती सुचिता वजराटकर, सुप्रिध्द गझलकार दिलीप पांढरपट्टे, विजय गावडे, पंढरीनाथ महाले हे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात साहित्य क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सत्कारानंतर श्रोता संवाद हा कार्यक्रम आयोजित केला आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. सचिन परूळकर व सहाकऱ्यांचे पोवाडा गायन, दुपारी ३ ते ४.३० कवी संमेलन होणार आहे. यावेळी उषा परब, वैशाली पंडित, तरुजा भोसले, मधुसूदन नानिवडेकर आदी कवींना निमंत्रित केले आहे. ४.३० ते ५ या वेळेत संमेलनाचा समारोप होणार आहे. या संमेलनास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समिती अध्यक्ष वृंदा कांबळी यांनी केले. (वार्ताहर)
आनंदयात्री मंडळाचे साहित्य संमेलन
By admin | Published: February 09, 2015 9:48 PM