मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कऱ्हाड येथील मार्केट यार्ड शाखेच्या वतीने धनाजी पाटील यांना वाहनाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पृथ्वीराज पाटील, पंकज शेवाळे, अवधूत पाटील, आशिष पाटील, शाखाप्रमुख सुनील गिरिगोसावी, सर्जेराव धस, नीलेश काळे, सुरेश पाटील, संजय सावंत उपस्थित होते.
अभिजित पाटील म्हणाले, या शाखेने १२ कोटी ७५ लाख ८३ हजार ठेवी जमा करून ८ कोटी ७० लाख ४८ हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेने जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करून सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपादन केला. सुशिक्षित युवकांना आर्थिक साहाय्य करून स्वत:च्या पायावर उभे केले असून, संस्थेने आर्थिक व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
सुनील गिरीगोसावी यांनी स्वागत केले; तर नीलेश काळे यांनी आभार मानले. (वा. प्र.)
फोटो : १८केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड-मार्केट यार्ड येथील आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या वतीने वाहन वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील उपस्थित होते.