फलटण : येथील अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक-निंबाळकर (बाईसाहेब महाराज) यांचे मंगळवारी मध्यरात्री पुणे येथे वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मार्केट कमिटीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या त्या चुलती, माजी आमदार विजयसिंह ऊर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या त्या मातोश्री होत.
२७अनंतमालादेवी नाईक-निंबाळकर