शेखर जाधववडूज: कायम अन्याय सहन करावा लागत असल्याने खटाव तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गत महिन्याभरापासून सुरू असलेल्या माण तालुक्याकडील तारळीच्या कँनालच्या प्रवाह बदलून खटाव तालुक्याकडे वळविला . संबंधित पंचवीस ते तीस जणांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकरी संघटनेच्या न्याय भूमिकेमुळे स्वाभिमानीने खटाव तालुक्याचा स्वाभिमान जोपासल्याच्या चर्चा परिसरात सुरू होत्या.खटाव तालुक्यातील पुर्व भागातील गावांची उन्हाळी आवर्तनाची मागणी आहे. मात्र तरी देखील राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू असलेला श्रेयवाद आणि संबंधित अधिकाऱ्यांची टाळाटाळ याबाबत तहसिलदार कार्यालयाला येत्या सोमवारी (दि.८) घेराव घालण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर डाळमोडी हद्दीतील तारळी गेटवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाच तारीख ओलांडून गेली तरी अधिकारी पाणी सोडण्याची तयारी दाखवत नसल्याने संयमाचा बांध फुटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक आंदोलन करत अखेर पाणी सोडले. खटाव तालुक्यातील डाळमोडी येथील तारळीचे माण व खटावसाठी गेट असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी हे गेट खटाव तालुक्याकडे वळविले. सुमारे तीन तास हे पाणी सुरू होते. वडूज पोलिसांनी शेतकरी संघटनेचा सुमारे तीस कार्यकर्ते ताब्यात घेऊन त्यांना वडूज पोलिस ठाण्यात ठेवले आहे.
..अन् माणचे पाणी खटावकडे वळविले, पोलिसांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 5:26 PM