शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

अंगणवाडी तार्इंचा भर पावसात आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:01 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : अनेकवेळा शासनाकडे दाद मागूनही त्यांच्याकडून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही. शासनाने गेली दहा महिने मानधन वाढीचा प्रस्ताव तयार करूनही मानधन वाढविले नसल्याने ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. आज नऊ दिवस झाले तरी शासनाकडून मागण्या मान्य केल्या जात नाही. त्या मान्य कराव्यात, यांसह विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : अनेकवेळा शासनाकडे दाद मागूनही त्यांच्याकडून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही. शासनाने गेली दहा महिने मानधन वाढीचा प्रस्ताव तयार करूनही मानधन वाढविले नसल्याने ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. आज नऊ दिवस झाले तरी शासनाकडून मागण्या मान्य केल्या जात नाही. त्या मान्य कराव्यात, यांसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी सातारा जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चातील सहभागी महिलांनी भर पावसात प्रांताधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत आंदोलनही केले. अंगणवाडी कर्मचारी संघटेनेच्या अध्यक्षा कॉ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.यावेळी संघटनेच्या अध्यक्षा कॉ. आनंदी अवघडे, माणिकराव अवघडे, कॉ. प्रतिभा भोसले, निलोफर मुल्ला, सुरेखा शेवाळे, संजीवनी कुलकर्णी, शकुंतला माने, रशिदा शेख, माया तडाखे, यशोदा निकम, अनिता चव्हाण, निर्मला माने आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मोर्चाला उपस्थिती लावली होती.शिष्टमंडळाच्या वतीने नायब तहसीलदार अरुण निकम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाच्या मागण्यांबाबत गेल्या दहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याचप्रमाणे इतर केलेल्या मागण्यांचा विचार करून मानधन वाढ करणे गरजेची आहे. शासनाने बचत गटांची बिले द्यायची सोडून याउलट कर्जात बुडालेल्या बचत गटातील महिलांना आहाराची सक्ती करून संप मोडण्याचे काम केले जात आहे. तसेच आशा, स्वयंसेविका या मोबदल्यावरील आरोग्य कर्मचारी आहे. त्यांना कोणताही मोबदला दिला जातनाही. त्यांनी जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम करू नये. आणिजर शालेय पोषण आहाराच्या प्रकल्पाचे नुकसान होऊ द्यायचेनसेल तर शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनातत्वरित वाढ करावी. अन्यथा जोपर्यंत मानधन वाढ मिळत नाही तोपर्यंत बेमुदत संप पुढे सुरू ठेवला जाईल तसेच आंदोलनही अधिक तीव्रकेले जाईल. असा इशाराहीयावेळी अंगणवाडी सेविकांनीदिला.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मानधन वाढ, बचट गटांची गेल्या दहा महिन्यांपासूनच थकीत आहार बिले मंजुरी, झेरॉक्स व स्टेशनरी, आॅनलाईन अहवालावर केलेला दोन हजार रुपये खर्च आदी प्रमुख मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कृष्णा नाक्यातून दुपारी दीड वाजता मोर्चास प्रारंभ झाला.मोर्चा बसस्थानक परिसरातील प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तत्पूर्वी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या वतीने विजय दिवस चौक, कर्मचारी भाऊराव पाटील चौक या ठिकाणी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी दुपारनंतर सुरू झालेल्या भर पावसातच अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला न्याय द्या,’ आदी मागण्यांच्या घोषणा यावेळी मोचातील सहभागी महिलांनी दिल्या.या मोर्चामध्ये कºहाड, कोरेगाव, खटाव, पाटण, फलटण, सातारा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.हातात झेंडा आणि डोक्यावर छत्रीशासनाकडून कोणत्याही परिस्थितीत मानधन वाढ करून घ्यायचीच. यासह अनेक मागण्यांसाठी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी स्वत:सोबत झेंडेही आणले होते. प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतेवेळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यात पावसापासून संरक्षण करण्यासाठी काहींनी एका हाता झेंडा आणि दुसºया हातात डोक्यावर छत्री धरली होती.आजीबाईही मोर्चात सहभागीमंगळवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी संघटना महिलांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात पावसाने सुरुवात केली. या मोर्चात एक आजीबाईही सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्यावेळी पुढे भाषण सुरू असताना पाठीमागे त्या पावसात भिजत भाषण ऐकत होत्या.