शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

Satara: लेक भरती झाली; पण आनंद पाहायला माउलीच नाही राहिली!

By सचिन काकडे | Updated: February 10, 2025 18:44 IST

अत्यंत बेताच्या परिस्थितीतही तिने पोलिस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. सतत अपयश व अनेक संकटे येऊन देखील ती खचली नाही

सातारा: ‘येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिऊन अडखळणे, पावलांना पसंत नाही’ कवी सुरेश भट यांच्या या कवितेच्या ओळी खऱ्या अर्थाने जगल्या असतील तर त्या देवळीमुरा (ता. महाबळेश्वर) येथील अनिता ढेबे (वय २३) हिने. मायेचे छत्र हरपले असतानाही अनिता संकटांवर मात करत पोलिस दलात भरती झाली. मात्र, लेकीचे हे यश पाहण्यापूर्वीच आईने जगाचा निरोप घेतला.अनिताचे ढेबे हिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, महाविद्यालयीन शिक्षण तळदेव येथील ईलाबेन मेहता विद्यालयात झाले. त्यानंतर मार्गदर्शक विष्णू ढेबे व प्रा. समाधान देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत बेताच्या परिस्थितीतही तिने पोलिस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला.सतत अपयश व अनेक संकटे येऊन देखील ती खचली नाही. अडथळ्यांसोबत शर्यत सुरू होती. यश मिळवायचे असेल तर पावलांना थकून चालणार नाही हे तिने आपल्या मनाशी ठाम ठरवले होते. अखेर अडथळ्यांच्या या शर्यतीत अनिता विजयी झाली. पोलिस भरतीत यश मिळवत तिची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे.आपल्या यशाचे सर्व श्रेय अनिता आपल्या वडिलांसह मार्गदर्शक विष्णू ढेबे आणि प्रा. समाधान देशमुख यांना देते. ‘ज्यावेळेस मी निकाल पाहिला त्यावेळेस सर्वप्रथम माझ्यासमोर माझ्या वडिलांचा कष्ट करतानाचा चेहरा आला. पण हे यश पाहायला आज माझी आई हवी होती असं म्हणताना अनिताने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आयुष्यभर माझ्या आई-वडिलांनी खूप कष्ट केले. आई तर आम्हाला सोडून गेली, मात्र वडिलांचे पुढचे आयुष्य सुखात घालवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशा भावना तिने व्यक्त केल्या.

लहानपणापासून अनिता हुशार आहे. तिला शिक्षणाची आवड होती. ती आयुष्यात काहीतरी करेल हा विश्वास होता आणि तिने करून दाखविले. खूप आनंद होत आहे आणि खूप अभिमान वाटतोय. आयुष्यभर केलेल्या कष्टाचे चीज झाले. - लक्ष्मण ढेबे, अनिताचे वडील

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस