सातारा : सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल, असे संदिग्ध विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने भाजपचे कार्यकर्ते भलत्याच गोंधळात पडले आहेत.सातारा - जावली विधानसभा मतदारसंघाच्या जन संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माधव भंडारी, रवींद्र अनासपुरे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जावळीचेनेते दीपक पवार, मनोज घोरपडे, प्रभाकर साबळे, धनंजय जांभळे, मिलिंद काकडे, महेश शिंदे, सिद्धी पवार, प्राची शहाणे, विजय काटवटे, अमित कुलकर्णी, आदी उपस्थित होते.चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, सातारा-जावलीतील जनता शिवेंद्रसिंहराजेच्या विरोधात जनता मतदान करेल, असे नाही. सातारची विधानसभेची जागा भाजपला जिंकायची आहे. सातारा-जावली मतदारसंघाचा उमेदवार कोणदीपक पवार की, अन्य कोण हे योग्य वेळी पक्ष जाहीर करेल.साताऱ्यात जनसंपर्क कार्यालय सुरू करून मते मिळणार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने गरीब जनतेपर्यंत पोचण्यासाठी सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. तसे उपक्रम साताऱ्यात सुरू केले पाहिजेत तरच जनता भाजपच्या पाठीशी राहील.
जनतेच्या प्रश्नासाठी सुरू केलेले जनसंपर्क कार्यालय २४ तास सुरू राहिले पाहिजे. मी येता- जाता अचानकपणे भेट देईन. त्यावेळी जर जनसंपर्क कार्यालय बंद दिसले तर मग उमेदवारी बाबतीत विचार करावा लागेल असा टोलाकोणाचेही नाव न घेता लगावला.मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढामराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची इच्छा आहे. यासाठी सरकारने मागासवर्गीय आयोग नेमला होता. येत्या काही दिवसांत आयोग आपला अहवला न्यायालयात सादर करेल, त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर लढाई सरकार ताकदीने लढेल, असे आश्वासक विधानही मंत्री पाटील यांनी केले.