लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : जिल्ह्यातील तीन पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवा तसेच विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी सातारा येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर या पदकाचे वितरण केले जाणार असून, या गौरवामुळे जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.गुणवत्तापूर्ण सेवा तसेच विशेष कामगिरी बजावणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना दरवर्षी स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील तीन पोलिसांना या पदकाने सन्मानित केले जाणार आहे. उंब्रज पोलीस ठाण्याच्या मसूर दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक बजरंग शामराव कापसे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे. कºहाड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक मिलिंद काळू साबळे व औंध पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रशांत प्रकाश पाटील यांना नक्षलग्रस्त विभागातील गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी चार वर्षे समाधानकारक सेवा आणि त्यांनी दाखविलेल्या खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक जाहीर केले आहे.मसूर दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक बी. एस. कापसे यांनी यापूर्वी मुंबई शहर, नागरी हक्क संरक्षण विभाग, महामार्ग वाहतूक विभाग, पुणे जिल्ह्यात बारामती, हवेली, खडकवासला, सांगली जिल्ह्यात आटपाडी, सांगोला, तुळसण, अक्कलकोट, सातारा सीआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.सहायक निरीक्षक कापसे यांना २०१४ मध्ये पोलिस महासंचालकांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊनही गौरविण्यात आले आहे. कºहाड ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक मिलिंद साबळे यांनी २००९ ते २०१२ या कालावधीत चंद्रपूर जिल्हा, २०१२ ते २०१३ या कालावधीत गडचिरोली जिल्'ाच्या नक्षलग्रस्त भागात सेवा बजावली आहे. २०१३ मध्ये त्यांची सातारा शहर पोलिस ठाण्यात नेमणूक झाली. तर जून २०१६ पासून ते कºहाड ग्रामीण पोलिस ठाण्यात सेवा बजावत आहेत.माणच्या सुपुत्राला ‘शौर्यपदक’माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील दत्तात्रय काळे यांची निवड पोलीस शौर्य पदकासाठी करण्यात आली आहे. गडचिरोली येथे जंगलव्याप्त भागात नक्षलवाद्यांशी लढताना दाखविलेल्या शौर्याबद्दल हे पदक जाहीर झाले आहे.
जिल्ह्यात तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:09 AM