सातारा : अज्ञान, अविवेक आणि अंधश्रध्दा यांच्याविरोधात कायम लढा देणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे होळी दिवशी खेड, ता. सातारा येथे दुर्गुणांची होळी पेटवून वेगळा आदर्श घालून दिला.चला दुर्गुनांची होळी करुया...विज्ञानाची कास धरुया हा उपक्रम खेड परिसरातील मेकॅनिकल कॉलनी समोरील मैदानावर राबविण्यात आला. अंनिस व खेड ग्रामपंचायतीच्यावतीने कचरा एकत्रित गोळा केला. दुर्गुणांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करण्यात आला होता. या पुतळ्यावर अंधश्रध्दा, तंबाखू, बुवा-बाजी, भ्रष्टाचार, गुटखा, दारु, विडी सिगारेट, भांग, गांजा, तपकीर आदींचा उल्लेख करण्यात आला होता.ही होळी खेडच्या सरपंच इंदिराताई बोराटे यांच्या हस्ते पेटविण्यात आली. अंनिस बुवाबाजी संघर्ष समितीचे राज्य सदस्य भगवान रणदिवे यांनी तुम्हा डॉ. दाभोलकर.. हे गीत गायले. सर्वांनी कोरस दिला. अंनिसचे राज्य प्रधान सचित प्रशांत पोतदार यांनी विवेकाचा आवाज बुलंद करुया, शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, होळी लहान करु, पोळी दान करु, दुर्गुणांची होळी करु, विज्ञानाची कास धरु अशा घोषणा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंनिसचे सातारा शहर कार्याध्यक्ष अॅड. हौसेराव धुमाळ यांनी केले. दुर्गुणांची प्रतिमा बनविण्यासाठी दिलीप महादार, केशवराव कदम यांनी परिश्रम घेतले. श्रीनिवास जांभळे, रोहित घाडगे, सूरज साळुंखे, जितेंद्र शिवदास, विजय पवार, वीर पोतदार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सुमित भोसले यांनी आभार मानले.
अंनिसने पेटवली दुर्गुणांची होळी, खेड गावात उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:54 PM
अज्ञान, अविवेक आणि अंधश्रध्दा यांच्याविरोधात कायम लढा देणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे होळी दिवशी खेड, ता. सातारा येथे दुर्गुणांची होळी पेटवून वेगळा आदर्श घालून दिला.
ठळक मुद्दे अंनिसने पेटवली दुर्गुणांची होळी, खेड गावात उपक्रमडॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या आठवणींना उजाळा