सातारा : पाणीदार सातारा जिल्यातील प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांमध्ये मिळून २० फेबु्रवारीपर्यंत तब्बल १०२.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचबरोबरच बहुतांश लघुप्रकल्प व तलावांमध्येही पाणी शिल्लक असल्याने यंदा उन्हाळा सुस' जाणार आहे.
सातारा जिल्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. जिल्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. दुष्काळी मराठवाड्यातील एखाद्या जिल्'ात वर्षभर पडत असेल तेवढा पाऊस महाबळेश्वर, नवजा, तापोळा या परिसरात एका दिवसात पडतो. त्यामुळे या जिल्'ातील धरणेही मोठ्या प्रमाणावर भरलेले असते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या १०५.२५ टीएमसी क्षमतेचे कोयना धरणात दरवर्षी आॅगस्टपर्यंतच भरून ओसांडून वाहत असते.सातारा, महाबळेश्वर, जावळी, वाई, पाटण, कºहाड या परिसरात मुसळधार पाऊस पडत असला तरी माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांना दुष्काळाच्या झळाही तेवढ्याच तीव्रतेने जाणवतात. जनावरांना पशुधन मिळत नसल्याने चारा छावण्या सुरू करण्याची वेळ माण, खटावमध्ये येत होती.गेल्यावर्षी जिल्'ात चांगल्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये मुलबक पाणीसाठा झाला आहे. प्रमुख धरणांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता असणार नाही; पण शेतीच्या पाण्याचा प्रश्न डोके वर काढू शकतो.लघु प्रकल्पांतही साठासातारा शहराला कास, शहापूर, महादरे तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या तिन्हीमध्ये सध्या पाणी आहे. तरीही सातारा पालिकेने आठवड्यातून एकदा पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे येरळामध्ये ०.२२, नेरमध्ये ०.१३६, आंधळीत ०.०८८ तर राणंदमध्ये ०.१३४ टीएमसी पाणी शिल्लक आहे.दुष्काळीपट्ट्यातही पाणी योजनेचे काममाण, खटाव या तालुक्यामधील दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी अनेक गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याची कामे झाले आहेत. या भागातही पाणीसाठा काही अंशी शिल्लक आहे. एप्रिल, मे महिन्यात त्या तालुक्यांची तहान भागविण्याची मदार या कामावर आहे.आता बाष्पीभवनही वाढणारमार्च महिना उजेडला की उन्हाची तीव्रता वाढणार आहे. साहजिकच बाष्पीभवन झपाट्याने होऊन पाणी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या मुबलक पाणी असले तरी पाण्याची बचत करणेच योग्य ठरणार आहे.