पिंपरी : शहरातील अनधिकृत बांधकामप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले असल्याने दोन वर्षापासून महापालिकेतर्फे कारवाईची मोहीम सुरू आहे. अशातच नदीपात्रतील अवैध बांधकाम प्रकरणी आणखी एक जनहित याचिका दाखल झाली आहे. ही याचिका महापालिकेच्या विरोधात दाखल झाली आहे.
कासारवाडी येथील शेख तौशिफ शब्बीर यांनी नदीपात्रतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 1क् सप्टेंबर 2क्14 ला ही याचिका दाखल केली आहे. नदीपात्रतील काही अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली. मात्र त्याच बांधकामांच्या परिसरात असलेल्या अन्य अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली नाही. ही बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. महापालिका आयुक्त तसेच संबंधित मिळकतधारक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याबाबत नोटीस प्राप्त झाली नसल्याचे पालिकेच्या अधिका:यांनी सांगितले.
सांगवी येथील जयश्री डांगे यांनी नदीपात्रतील अवैध बांधकाम प्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत 63 हजार अवैध बांधकामांवर कारवाई करावी. असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)