शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

अप्पासाहेब सार्वजनिक जीवनाचे भूषण : राम नाईक: जयवंतराव भोसलेंना जयंतीदिनी अभिवादन; म्युझियमचे लोकार्पण, पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:35 PM

कºहाड : ‘जयवंतराव भोसले हे जबरदस्त इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्त्व होते. म्हणून तर त्यांच्या हातून एवढे मोठे कार्य उभे राहिले. त्यांच्या कार्याविषयी ऐकून होतो;

कºहाड : ‘जयवंतराव भोसले हे जबरदस्त इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्त्व होते. म्हणून तर त्यांच्या हातून एवढे मोठे कार्य उभे राहिले. त्यांच्या कार्याविषयी ऐकून होतो; पण ते प्रत्यक्ष पाहता यावे, त्यातून मला काही प्रेरणा घेता यावी म्हणून आजच्या जयंती कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. अप्पासाहेब महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनाचे भूषण आहेत,’ असे मत उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले.कºहाड येथे जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते जयवंतराव भोसले म्युझियमचे लोकार्पण, जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि ‘भगीरथ’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार पतंगराव कदम, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार दिलीप देशमुख, चिमणराव डांगे, मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. सुरेश भोसले, रघुनाथराजे निंबाळकर, मधुकर भावे, डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.राम नाईक म्हणाले, ‘मी आमदार असताना १९८० मध्ये जयवंतराव भोसले हेही काहीकाळ विधान परिषदेवर आमदार होते. त्यावेळी त्यांच्याशी माझा परिचय झाला. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची त्यावेळी ख्याती निर्माण झाली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात कुतूहल होते. येथे आल्यानंतर त्यांच कर्तृत्व पाहायला आणि ऐकायला मिळालं. अन् अप्पासाहेब महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनाचे भूषण आहेत, याची मनोमन खात्री पटली. माणसं अलहाबादला त्रिवेणी संगम पाहायला येतात; पण याठिकाणी जयवंतराव भोसले यांच्या म्युझियमचे लोकार्पण, पुतळ्याचे अनावरण आणि त्यांच्यावरील ‘भगीरथ’ या ग्रंथाचे प्रकाशन करून त्रिवेणी संगम साधला.’डॉ. पतंगराव कदम म्हणाले, ‘यशवंत हो, जयवंत हो या दोन भावांचं कर्तृत्व साºया महाराष्ट्रानं पाहिलं आहे. यशवंतराव चव्हाण यांनीही या दोघांना खिलार बैलांची जोड म्हणून गौरविले होते. त्यांचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे.’शिवाजीराव नाईक म्हणाले, ‘कृष्णा काठावर परिवर्तन घडविणारे नेतृत्व म्हणून जयवंतराव भोसले यांच्याकडे पाहावे लागेल. राज्याला प्रेरणा देतील, अशा प्रकारे त्यांनी संस्थांचा कारभार करून दाखविला.’माजी मंत्री दिलीप देशमुख म्हणाले, ‘सहकार क्षेत्र हे लोकशाहीच्या बळकटीचे क्षेत्र आहे, हे जयवंतराव भोसले यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.’मदनराव मोहिते म्हणाले, ‘जयवंतराव भोसले यांनी ‘आधी केले आणि मग सांगितले’ या उक्तीचा वापर केला. त्यामुळेच ही विकासगंगा पाहायला मिळते.’डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘अप्पांची जयंती आम्ही संकल्प दिन म्हणून साजरी करतो. त्यांनी केलेल्या कामाला यादिवशी उजाळा देतो. आणि जे अपूर्ण आहे, ते पूर्ण करण्याचा संकल्प करीत असतो.’डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण आज तितक्याच तोलामोलाचे असणाºया व्यक्तीच्या हस्ते होत आहे. उत्तरप्रदेशला उत्तम प्रदेश बनविण्याचा प्रयत्न राम नाईक करीत आहेत.’... अन् साºयांचे डोळे पाणावलेजयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती होती. तर समोर हजारो कार्यकर्तेही होते. व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला जयवंतराव भोसले यांच्या अर्धांगिनी जयमाला भोसले स्थानापन्न झाल्या होत्या. आणि कार्यक्रमाच्या मध्येच अप्पांना सुख-दु:खात साथ देणाºया जयमाला भोसले यांना सत्कारासाठी व्यासपीठावर बोलविण्यात आले. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले. तर सहृदयी सत्कार पाहून उपस्थितांच्या पापण्याही ओलावल्या.कºहाड येथे शुक्रवारी जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी मंत्री पतंगराव कदम, डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.